नर्गिस इज रेडी टू गो हॉलीवूड ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 10:43 IST
मेलिसा मॅक कार्थी आणि जॅसोन स्टॅथम यांच्यासोबत ‘स्पाय’ चित्रपटातून नर्गिस फाख्री हिने हॉलीवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर आता ती पुन्हा ...
नर्गिस इज रेडी टू गो हॉलीवूड ?
मेलिसा मॅक कार्थी आणि जॅसोन स्टॅथम यांच्यासोबत ‘स्पाय’ चित्रपटातून नर्गिस फाख्री हिने हॉलीवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा तिच्या आगामी इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी तयार झाली आहे.आगामी चित्रपटात नर्गिस आॅस्कर नॉमिनी कँडी क्लार्क आणि गोल्डन ग्लोब नॉमिनी बो देरेक यांच्यासोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे कथानक हे एका अमेरिकन पत्रकारावर आधारित आहे, जो बॉलीवूडमधील लग्नावर भारतात कथा लिहिण्यासाठी आलेला असतो.नर्गिस चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना ती म्हणते,‘ मला भूमिकेविषयी फार जवळीक वाटते आहे, म्हणून मी चित्रपटासाठी होकार दिला आहे. हा चित्रपट माझ्यासाठी आयुष्य बदलवणारा असेल असे मला वाटते.