टीमकडून नर्गिसने शिकली मराठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 17:54 IST
नर्गिस फाखरी हिने ‘बँजो’ चित्रपटासाठी शूटींग करायला सुरूवात केली तेव्हा तिच्यासमोर पहिला प्रश्न होता तो म्हणजे मराठी भाषेत बोलण्याचा. ...
टीमकडून नर्गिसने शिकली मराठी
नर्गिस फाखरी हिने ‘बँजो’ चित्रपटासाठी शूटींग करायला सुरूवात केली तेव्हा तिच्यासमोर पहिला प्रश्न होता तो म्हणजे मराठी भाषेत बोलण्याचा. तिला मराठीत बोलण्यासाठी चित्रपटाच्या टीमने मदत केली.दिग्दर्शक रवी जाधव आणि अभिनेता रितेश देशमुख हे दोघे एकमेकांमध्ये काय बोलतात ? हे कळण्यासाठी तिने टीमकडून काही शब्दांची मदत घेतली. अगोदर हिंदीतून काही शब्द शिकून मग त्यांचे मराठीत ती भाषांतर करत होती.