गेल्या काळापासून नर्गिसचे नाव अभिनेता उदय चोपडा याच्याशी जोडले जात होते. गेल्या काही वर्षांपासून हे दोघेही एकमेकांना डेट करीत होते. मधल्या काळात दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगत आहे. असेही म्हटले जात आहे की, दोघांचे ब्रेकअप झाले आहे. परंतु योग्य पुरावा नसल्याने ही केवळ चर्चाच होती. मात्र आता एक सबळ पुरावा समोर आला असून, त्यानुसार हे दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचे निश्चित आहे.
होय, नर्गिसचे असे काही फोटो समोर आले आहेत, ज्यावरून तिचे उदयसोबत ब्रेकअप झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळू शकतो. काही वेळापूर्वीच नर्गिसने एलॉन्जो नावाच्या व्यक्तीबरोबर तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. फोटोमध्ये दोघांची केमिस्ट्री पाहता त्यांच्यात अफेअर असावे असेच दिसते. मॅट एक अमेरिकन दिग्दर्शक आणि व्हिडीओ एडिटर आहे. फोटोमध्ये नर्गिस आणि मॅट एका ख्रिसमस ट्रिसमोर बसलेले आहेत.
मॅटनेदेखील नर्गिससोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघे पुढच्या वर्षी लग्न करण्याची शक्यता आहे. नर्गिसच्या एका जवळच्या व्यक्तीने प्रतिष्ठित वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटले की, नर्गिस एका प्रोजेक्टसाठी मुंबईत असून, लवकरच ती न्यू यॉर्कला जाणार आहे. सूत्रानुसार नर्गिस जेव्हा-जेव्हा मुंबईत असते, तेव्हा ती उदयला भेटण्यासाठी नक्की जात असते. परंतु यावेळेस तसे घडले नसल्याचे समजते.