Join us

नर्गिस फाखरीने दिली ‘ब्रेकिंग न्यूज’, स्वत:च सांगितले ‘त्या’ फोटोमागील सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 15:49 IST

अभिनेत्री नर्गिस फाखरी ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. होय, काल जेव्हा नर्गिस विमानतळावर स्पॉट झाली तेव्हा तिच्या शरीराचा आकार ...

अभिनेत्री नर्गिस फाखरी ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. होय, काल जेव्हा नर्गिस विमानतळावर स्पॉट झाली तेव्हा तिच्या शरीराचा आकार बघून ती गर्भवती असल्याची जोरदार चर्चा रंगली. लूज ड्रेसमध्ये असलेली नर्गिस चेहरा लपवित विमानतळाच्या बाहेर पडली. तिचे हेच फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. शिवाय लग्नाअगोदरच नर्गिस गर्भवती असल्याच्या चर्चाही चविष्टपणे रंगविल्या जात आहेत. आता तिने या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी लोकांच्याच चेष्टामस्करीच्या भाषेत खुलासा केला आहे. नर्गिसने व्हायरल होत असलेला तोच फोटो तिच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर करीत लिहिले की, ‘ब्रेकिंग न्यूज... हॅम्बर्गरने यास नकार दिला आहे की, तो तिचा आहे.’ त्यानंतर नर्गिसने आणखी एक ट्विट केले, ज्यामध्ये लिहिले की, ‘मी केलेला हा जोक कोणाला समजला काय? ओके... मला असे वाटते की, मला काहीतरी आवाज येत आहे. असो, चेहºयावरील हास्य कायम ठेवील. धन्यवाद... बाय!’ यावेळी नर्गिसने फॅशन लेबल जॅडिग अ‍ॅण्ड वोल्टेयरच्या ड्रेसचा एक स्क्रीनशॉटही यावेळी शेअर केला आहे. वास्तविक, सध्या नर्गिसचे वजन वाढले आहे. त्यामुळेच कदाचित तिचे गर्भवती असल्यासारखे पोट दिसत असावे. इंडस्ट्रीमध्ये नर्गिस सर्वाधिक फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळेच तिचा हा लूक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. असो, नर्गिसच्या या ट्विटमुळे ती गर्भवती नसावी असेच काहीसे दिसत आहे. असो, नर्गिस अखेरीस ‘बॅन्जो’ या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख याच्यासोबत बघावयास मिळाली होती. नर्गिस गेल्या काही दिवसांपासून विदेशात होती. बॉलिवूडबरोबर ती मॉडलिंगमध्येही सध्या काम करीत आहे. काही बॉलिवूड प्रोजेक्टवर ती काम करीत असून, लवकरच ती पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे. दरम्यान, नर्गिसचा हा लूक संभ्रम निर्माण करणारा असल्यानेच ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आता नर्गिसनेच याबाबतचा खुलासा केल्याने, तिच्या चाहत्यांमधील चर्चांना पूर्णविराम मिळेल काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.