Join us

नंदिता दासला वाटते, दुय्यम भूमिका करण्यास तयार नसतात आजचे कलाकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 18:39 IST

बॉलिवूड अभिनेत्री नंदिता दासच्या मते ‘आजचे युवा कलाकार हे सहकलाकार किंवा दुय्यम दर्जाच्या हिरोची भूमिका करण्यास तयार नसतात. त्यांना ...

बॉलिवूड अभिनेत्री नंदिता दासच्या मते ‘आजचे युवा कलाकार हे सहकलाकार किंवा दुय्यम दर्जाच्या हिरोची भूमिका करण्यास तयार नसतात. त्यांना एकाच धाटणीच्या भूमिका हव्या असतात.’ उर्दू साहित्यिक मंटो यांच्यावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता करीत आहे. ती म्हणाली, तिच्या चित्रपटातील कलाकार निवडताना खूप अडचणी आल्या. मंटोचा मित्र श्यामची भूमिका करण्यासाठी कलाकार निवडताना अधिकच त्रास झाला. नंदिताच्या मते आजच्या घडीला खूप चांगले कलाकार आहेत. मात्र ही भूमिका करण्यासाठी कुणीही तयार नव्हते. त्यांच्यावर देखील दबाव आहे. मी यामध्ये दुय्यम दर्जाचा दिसेन अशी त्यांची भावना असते. ज्याला निवडले त्या व्यक्तीबाबत आम्ही आनंदी आहोत. या चित्रपटात हे पात्र खूप महत्त्वाचे आहे. कोणतीही कथा ही एखाद्या भूमिकेपेक्षा मोठी असते,’ असे नंदिता म्हणाली.ठराविक भूमिकांमध्येच हे कलाकार अडकल्याचा ठपका नंदिताने ठेवला आहे. ‘आमच्या उद्योगात सातत्याने आव्हाने असतात. प्रत्येकाचा स्वत:चा दृष्टीकोन आहे. ते मी मान्य करते आणि त्याचा सन्मानही करते. तुम्ही जर दुय्यम दर्जाच्या भूमिका केल्या तर तुमचा तसा ब्रँड होतो. जर एखाद्याने खलनायक रंगविला तर तुम्हाला तशाच भूमिका मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही एकाच धाटणीचे बनता,’ं असे नंदिताने मान्य केले.मंटो ही पाकिस्तानी लेखक सादत हसन मंटो यांची आत्मकथा असून नवाजुद्दीन सिद्दीकी हा प्रमुख भूमिकेत आहे. कमिने आणि डी-डे या चित्रपटात भूमिका केलेला अभिनेता चंदन राय सन्याल हा देखील चित्रपटात असणार आहे. अर्थात तो श्यामची भूमिका करणार नाही. चंदन हा श्यामची भूमिका करीत नसून तो आणखी एका लेखकाची भूमिका करीत आहे. श्यामची भूमिका कोण करेल, हे लवकरच कळेल, असे नंदिता म्हणाली.