Join us
Daily Top 2Weekly Top 5

नानांना भेटला नवा ‘मित्र’; फोटो असा की नुसता नाद खुळा!

By रूपाली मुधोळकर | Updated: October 18, 2020 12:30 IST

नानांनी हा सुंदर फोटो शेअर केला आणि चाहतेही या सुंदर फोटोच्या प्रेमात पडलेत.

ठळक मुद्देनाना पाटेकर यांनी   मराठी, बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तुमचा आमचा आवडता नाना अर्थात नाना पाटेकर सध्या चित्रपटांपासून दूर आहेत. पण सोशल मीडियावर मात्र चांगलेच अ‍ॅक्टिव्ह आहेत. चाहत्यांसाठी ते अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. अलीकडे नानांनी असाच एक फोटो शेअर केला आणि हा फोटो क्षणात व्हायरल झाला. एक चिमणी अलगद नानांच्या हातावर येऊन बसलेली या फोटोत दिसतेय. ‘मित्र... हा फोटो खूप सुंदर आहे,’ असे हा फोटो शेअर करताना नानांनी लिहिले. नानांनी हा सुंदर फोटो शेअर केला आणि चाहतेही या सुंदर फोटोच्या प्रेमात पडलेत.

चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला. ‘सच्च्या माणसालाच असे मित्र भेटतात,’ असे एका चाहत्याने यावर कमेंट करताना लिहिले. तर अन्य एका चाहत्याने, ‘बॉलिवूडचा सर्वात प्रामाणिक आणि सच्चा अभिनेता,’असे लिहित नानांचे कौतुक केले.अलीकडे नाना पाटेकर यांनी सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी सुशांतच्या पाटण्यातील घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. सुशांतच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून नानांनी श्रद्धांजली वाहिली होती. यानंतर त्याच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. जवळपास अर्धा तास नाना पाटेकर सुशांतच्या कुटुंबीयांसोबत होते. 

नाना पाटेकर यांनी   मराठी, बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अग्निसाक्षी, क्रांतीवीर या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यांना आजवरच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले असून त्यांच्या अभिनयाचे अनेक फॅन्स आहेत. बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते.   क्रांतीवीर, वेलकम, परिंदा, अग्निसाक्षी, राजू बन बया जंटलमॅन, तिरंगा, अपहरण यांसारख्या अनेक हिंदी तर नटसम्राट, सिंहासन, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटे: द रिअल हिरो, आपला मानूस यांसारख्या मराठी चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :नाना पाटेकर