कॅटकडून चुकीने आगामी चिपटाचे नाव झाले ‘लीक’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2016 13:38 IST
काही दिवसांपूर्वी यशराजने सलमान-कॅट अभिनित ‘एक था टायगर’ या सिनेमाचा पुढील भाग ‘टायगर जिंदा है’ची अधिकृत घोषणा केली. पण ...
कॅटकडून चुकीने आगामी चिपटाचे नाव झाले ‘लीक’
काही दिवसांपूर्वी यशराजने सलमान-कॅट अभिनित ‘एक था टायगर’ या सिनेमाचा पुढील भाग ‘टायगर जिंदा है’ची अधिकृत घोषणा केली. पण तुम्हाला माहित आहे का की, इतक्या लवकर त्यांना या सिनेमाचे नाव घोषित करायचे नव्हते.कॅटरिनाच्या एका चुकीमुळे त्यांना तसे करावे लागले. म्हणजे त्याचे झाले असे की, ‘बार बार देखो’साठी संपूर्ण भारतात फिरत असताना कॅटच्या तोंडून चुकीने/अनावधानाने ‘टायगर जिंदा है’ हे नाव निघाले. ती म्हणाली की, मला ‘एक था टायगर’पेक्षा ‘टायगर जिंदा है’ हे नाव अधिक आवडते.बस मग काय, ही बातमी मीडियामध्ये व्हायरल झाली. निर्मात्यांना नाईलाजाने या सिनेमाची अधिकृत घोषणा करावी लागली.या चित्रपटात कॅट आणि सलमान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत; मात्र दिग्दर्शक कबीर खानच्या ऐवजी ‘सुल्तान’ फेम अली अब्बास जफरच वर्णी लागली आहे.