Join us

जयललितांविषयी ट्वीट केलेल्या कमल हसनला नेटीझन्सने धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 18:06 IST

एकीकडे जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूमध्ये शोककळा पसरली आहे.सर्वच माध्यामतून सोशल मीडियावरून जयललिता यांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.मात्र दुसरीकडे कमल ...

एकीकडे जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूमध्ये शोककळा पसरली आहे.सर्वच माध्यामतून सोशल मीडियावरून जयललिता यांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.मात्र दुसरीकडे कमल हसनच्या वादग्रस्त ट्वीटमुळे सोशल मीडियावर वातावरण तापलेले  पाहायला मिळत आहे.कमल हासन यांनी  ''जयललिता यांच्यावर अवलंबून असणा-यांसोबत माझी सहानभूती आहे'' असे तामिळ भाषेत ट्विट केले. यांवर नेटीझन्सने कमल हसनला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. कमल हसन यांना नेमके म्हणायचे तरी काय आहे? अशा शोकाकुल वातावरणातही कमल हसनने वादग्रस्त व्टीट करण्याची संधी देखील सोडली नाही.त्यामुळे नेटीझन्सने त्यांच्यावर राग ओकत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.