Join us
Daily Top 2Weekly Top 5

आला रे आला नागराजच्या 'झुंड'चा दमदार टीझर आला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 12:20 IST

झुंड...नही सर टीम कहीये टीम..!!!  

झुंड सिनेमाच्या पोस्टरनंतर आज टीझर आऊट झाला आहे. या टीझरमध्ये काही मुलं हातात ऱ्होड, लोखंडी सळ्याघेऊन चालेली दिसतायेत. या टीझरमध्ये बिग बी अमिताभ बच्चन कुठेच दिसले नाहीत.  झुंड...नही सर टीम कहीये टीम..!!!  असा दमदार आवाजात अमिताभ यांच्या डायलॉग ऐकायला मिळतो आहे.  दिग्दर्शक नागराज मंजुळेने सोमवारी रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन पाठ मोरे उभं दिसतं होते. टीझरमध्ये सुद्धा नागराजने कोणाचाच चेहरा दाखवलेला नाही. आतापर्यंत या सिनेमाची रिलीज डेट नागराजने गुलदस्त्यात ठेवली होती त्यावरुन ही आता पडद्या उचलण्यात आला आहे. 8 मे 2020ला अमिताभ बच्चन व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिकेत झळकणार असल्याचे समजतंय. अमिताभ यांचा हा सिनेमा फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.‘झुंड’ हा सिनेमा भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून प्रोड्यूस करत आहेत.

हा नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या पहिल्या चित्रपटात महानायक अमिताभ दिसणार आहेत. साहजिकचं त्यांच्यासाठीचं नव्हे तर तमाम मराठीजनांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे या सिनेमाला संगीत अजय-अतुल या जोडीने दिले आहे. नागराजचे दिग्दर्शन, अमिताभ बच्चन यांचा अभिनय आणि अजय-अतुलचे संगीत त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.   

टॅग्स :नागराज मंजुळेअमिताभ बच्चन