Join us

नागर्जुनच्या मुलाचे लग्न तुटल्याचे 'हे' आहे कारण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 09:52 IST

साऊथमधल्या चित्रपटाचा सुपरस्टार नागार्जुन अक्कनीनेच्या मुलगा अखिलचे लग्न तुटल्याचे समजतेय. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात बिझनेसमॅन जीवीके रेड्डी यांच्या नातीशी मोठ्या ...

साऊथमधल्या चित्रपटाचा सुपरस्टार नागार्जुन अक्कनीनेच्या मुलगा अखिलचे लग्न तुटल्याचे समजतेय. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात बिझनेसमॅन जीवीके रेड्डी यांच्या नातीशी मोठ्या थाटामाटात त्याचा साखरपुडा झाला होता. श्रिया भूपाल असे रेड्डींच्या नातीचे नाव आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कुटुंबाच्या चर्चेनंतर लग्न मोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अखिल आणि श्रिया डेस्टिनेशन वेंडिम मे महिन्यात इटलीला होणार होते. या लग्नात साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकांसह अनेक राजकारण्यांचाही समावेश होता. एकूण 700 पाहुणे लग्नात सहभागी होणार होते.  लग्नात सामील होणाऱ्या पाहुण्यांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे. मात्र दोन्ही कुटुंबीयांकडून याबाबत कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.   लग्न मोडण्यात आल्याते लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना शनिवारीच सांगण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.याबाबत त्यांना ही कोणते कारण सांगितले गेलेले नाही. जे लोक इटलीला जाण्याचे तिकिट काढणार होते त्यांना हे तिकिट काढू नका असे सांगण्यात आले आहे. दोन्ही कुटुंबीयांना मिळून जे तिकिट्स काढले होते ते ही रद्द करण्यात आले आहेत.  मीडियाच्या रिपोर्टनुसार लग्न अखिल आणि श्रियाने रद्द केले आहे. दोघांच्या कुटुंबायांनी अखिल आणि श्रियाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही आपल्या लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.  अखिल ने 2015 मध्ये आलेल्या साऊथमधल्या एका चित्रपटातून त्यांने पदार्पण केले होते. तर श्रिया ही फॅशन डिझायनर आहे. तिने शाहिद कपूर आणि आलिया भट्टचे कपडे ही डिझायन केले आहेत. तसेच तिने साऊथमधल्या काजोल अग्रवाल, रकुल प्रीतसोबत ही काम केले आहे.