Join us

‘मै तेरा फॅन हो गया’वर नाचला किंग खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 02:04 IST

शाहरूख खान याचा आगामी चित्रपट ‘फॅन’ हा खरंतर त्याला आत्तापर्यंत प्रेक्षकातुन मिळालेल्या प्रेमाची पावती आहे. या चित्रपटाची विशेष बाब ...

शाहरूख खान याचा आगामी चित्रपट ‘फॅन’ हा खरंतर त्याला आत्तापर्यंत प्रेक्षकातुन मिळालेल्या प्रेमाची पावती आहे. या चित्रपटाची विशेष बाब ही की, शाहरूख स्वत: त्याच्या फॅनची भूमिका करणार आहे. किंग खान शाहरूख दिल्लीत ‘फॅन’ चित्रपटाचे शीर्षक गीत लाँच करण्यासाठी आला असताना प्रेक्षकांनी त्याला ‘फॅन अँथम’ म्हणूनच सादर केले. यावेळी या गाण्यावर शाहरूखने डान्स केला. हा व्हिडिओ जवळपास १५ सेकंदाचा असून यात तो ‘मैं तेरा फॅन हो गया’ गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. हे गाणे अत्यंत विचित्र प्रकारचे आहे. शाहरूखला हे गाणे शूट करताना खुप मजा आली. यशराज फिल्म्स च्या बॅनरखाली निर्माता आदित्य चोप्रा यांच्या निर्मितीतील चित्रपट ‘फॅन’ १५ एप्रिलला रिलीज होणार आहे.