Join us

​माझी ताकद, माझा अभिमान, माझा आनंद, माझे जीवन...लव्ह यू भाई...! अर्पिता खानने लिहिली भावूक पोस्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 12:49 IST

सलमान खान जामिनावर तुरूंगातून बाहेर येताच कुटुंबाच्या जीवात जीव आलाय. गत ५ तारखेला जोधपूरच्या एका न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी ...

सलमान खान जामिनावर तुरूंगातून बाहेर येताच कुटुंबाच्या जीवात जीव आलाय. गत ५ तारखेला जोधपूरच्या एका न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी सलमानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आणि यानंतरच्या दोन रात्री सलमानला तुरुंगात काढाव्या लागल्या.  याकाळात सलमानच्या  दोन्ही बहीणी अर्पिता खान व अलविरा खान भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. सलमानला शिक्षा सुनावली गेली तेव्हापासून तर त्याच्या जामीन मंजूर करेपर्यंतच्या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचा जिम्मा या दोन बहीणींनीच पार पाडला. सलमान तुरुंगातून सुटून मुंबईकडे रवाना झाला, त्याहीवेळी अर्पिता व अलविरा या दोघी त्याच्यासोबत होत्या. इतकेच नव्हे तर काळवीट प्रकरणाच्या निकालाच्या आदल्या रात्री अर्पिता सिद्धीविनायकाच्या चरणी पोहोचली होती. माझ्या भावाला वाचव, असे साकडे तिने बाप्पाला घातले होते. अर्पिता व अलविराचे भावावरचे प्रेम आताश: कुणापासूनही लपून राहिलेले नाही. अनेकप्रसंगी ते सिद्ध झाले आहे. अर्पिताची ताजी पोस्टही हेच सांगणारे आहे.होय, सलमान तुरुंगातून सुटल्यानंतर अर्पिता खानने सलमानबद्दल एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘माझी ताकद, माझी कमजोरी, माझा अभिमान, माझा आनंद, माझे जीवन, माझे जग... परमेश्वराची सुंदर भेट. तुझ्या आजूबाजूची सगळी नकारात्मकता आणि मस्तर दूर होवो. असाच चमकत राहा, हीच माझी प्रार्थना...लव्ह यू भाई,’ असे अर्पिताने सलमानला उद्देशून लिहिले आहे. अर्पिताची ही पोस्ट वाचून सलमानची काय स्थिती झाली असेल, हे वेगळे सांगायची गरज नाही.ALSO READ : ​सलमान खानने तुरुंगात मानला आसारामबापूचा सल्ला! आता कधीच करणार नाही ‘हे’ काम!अर्पिता खान ही सलीम खान आणि हेलन यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे. अर्पिता खानने २०१४ साली हिमाचल प्रदेशच्या आयुष शर्मा याच्याशी प्रेम विवाह केला होता. सलमानने अगदी थाटामात आपल्या बहिणीचे  लग्न लावले होते. अर्पिताला अहिल हा गोंडस मुलगा आहे. लवकरच अर्पिताचा पती आयुष शर्मा बॉलिवूड डेब्यू करतो आहे.