Join us

Must See Video : सनी लिओनीची खळबळजनक डॉक्यूमेंट्री, ओसामा बिन लादेनही होता प्रेमात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 12:27 IST

तिच्या प्रेमात अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनही असल्याचे सांगण्यात आले आहे. या शिवाय डॉक्यूमेंट्रीमधून अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत.

-Ravindra Moreपॉर्न स्टार ते बॉलिवूडपर्यंत प्रवास करणारी हॉट अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्यावर दिलीप मेहता यांनी ‘मोस्टली सनी’ ही डॉक्यूमेंट्री तयार केली आहे. या डॉक्यूमेंट्रीचा नुकताच ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या डॉक्यूमेंट्रीमधून अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. त्यात तिच्या प्रेमात अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनही असल्याचे सांगण्यात आले आहे. आसोमा बिन लादेनच्या अबेटाबादमधील घरातून सनीच्या काही व्हिडीओ सीडीही जप्त करण्यात आल्या होत्या.सनीच्या मते, जर ती जगासमोर सर्व कपडे उतरवते, तर पैसेही तिच कमवेल. इतरांनी का कमवावेत? दोन तासांच्या या डॉक्यूमेंट्रीमध्ये सनीचा पूर्ण जीवनपटच उलगडून सांगण्यात आला आहे.सनीच्या अयुष्यावरील ही डॉक्यूमेंट्री ‘टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल’मध्येही दाखवण्यात आली आहे. यावेळी या डॉक्यूमेंट्रीचे सर्वांनीच कौतुक केले. विशेष म्हणजे, ‘मामी फिल्म फेस्टीव्हल’मध्येही या सिनेमाचा प्रीमीअर दाखवण्यात आला.या डॉक्यूमेंट्रीमध्ये करनजीत कौर वोहरापासून ती एक पॉर्न स्टार आणि त्यानंतर तिचा बॉलिवूडमधील प्रवास चित्रीत करण्यात आला आहे.यामध्ये तिच्या जीवनातील अनेक चढ-उतारही दाखवण्यात आले असून बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिला कोणत्या संकटांचा सामना करावा लागला, याची माहिती देण्यात आली आहे. या डॉक्यूमेंट्रीमध्ये तिला समाजाने कशा पद्धतीने वाळीत टाकले हेही सांगण्यात आले आहे.सनी लिओनीला भारतात गेल्या तीन वर्षांपासून सर्वात जास्त गूगलवरुन सर्च केली गेले आहे.