Join us
Daily Top 2Weekly Top 5

Must see : अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोंचा नजराणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST

झी मराठी वाहिनीवर ‘काहे दिया परदेस’ मधून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी सामंत म्हणजेच सायली संजीव. गोड चेहरा आणि उत्कृष्ट संवादफेक हे तिच्या अभिनयाचे वैशिष्ट्य. मराठमोळ्या संस्कृतीत लहानाची मोठी झालेल्या सायलीचा जन्म धुळे जिल्हयात झाला. पूणे विद्यापीठातून तिने बी.ए.ची पदवी मिळवली.

झी मराठी वाहिनीवर ‘काहे दिया परदेस’ मधून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी सामंत म्हणजेच सायली संजीव. गोड चेहरा आणि उत्कृष्ट संवादफेक हे तिच्या अभिनयाचे वैशिष्ट्य. मराठमोळ्या संस्कृतीत लहानाची मोठी झालेल्या सायलीचा जन्म धुळे जिल्हयात झाला. पूणे विद्यापीठातून तिने बी.ए.ची पदवी मिळवली.कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिने मॉडेलिंगच्या करिअरला सुरूवात केली. टीव्ही कमर्शियल, फॅशन शो यांच्यामधून तिने तिच्यातील मॉडेलला प्रेझेंट केले.पोलीस लाईन, अलिबाग बायपास, आपदी नाईटस या चित्रपटांमध्ये तिने उत्कृष्ट भूमिका साकारल्या. तिची ही बासरी वाजवतानाची अदा नक्कीच तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.सायली संजीवने तमिळ, बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिला नेहमीच एक अष्टपैलू अभिनेत्री व्हायचं होतं. त्यामुळे तिने एका भाषेपर्यंत मर्यादित न राहता विविधांगी भूमिका साकारल्या.सायली संजीव जर अभिनेत्री झाली नसती तर एक राजकीय विश्लेषक झाली असती असे तिनेच एका मुलाखतीत सांगितले आहे. परंतु, तिच्या मराठी व्यक्तीरेखेने टीव्ही जगतातसह प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.