कल्कीने या फोटोद्वारे दिलेला संदेश कुणी कसा घेतला, हे दाव्यानिशी सांगता येणार नाही. पण कल्की मात्र या फोटोवर आणखी खुलासेवार बोलली. ‘महिला म्हणून नेहमी आपल्याला पुरूषांच्या दृष्टिकोनातून बघितले जाते. पण माझा हा न्यूड फोटो एका महिला फोटोग्राफरने काढला आहे. त्यामुळेच तो सोशल मीडियावर शेअर करावा, असे मला प्रकर्षाने वाटले. माझ्या मते,लोक काय म्हणतील याचा विचार न करता, तुम्ही जे आहात, जसे आहात, त्यावर तुमचे स्वत:चे प्रेम असायला हवे. जसे आहात तसे स्वत:ला स्वीकाराल तरच जग तुम्हाला स्वीकारले. मी माझा न्यूड फोटो शेअर केला, यात मला काहीही लाजीरवाणे वाटत नाही’ असे कल्की म्हणाली.एकंदर काय तर, कुणालाही जज करण्याआधी विचार करा, हेच कल्कीने सांगितले.
ALSO RAED : इशा गुप्ताचं नाही तर कल्की कोच्लिनही झाली ‘न्यूड’!!
कल्कीच्या आधी इशानेही हेच सांगितले होते. माझ्या सेमी न्यूड, न्यूड फोटोंवर काहीही बोला, मला फरक पडत नाही. कारण या फोटोत कुठलीही अश्लिलता नाही. माझ्या मते, केवळ हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे, असे इशा म्हणाली होती.