Join us  

'मुस्लिमांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मतं द्यायला हवीत, ओवेसी आणि..'; केआरकेचं ट्वीट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 1:12 PM

कमाल आर खान (KRK)ची लेटेस्ट पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान (KRK) बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असतो. केआरके सोशल मीडियावर सक्रीय असतो. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केआरके कोणत्या ना कोणत्या कलाकाराला ट्रोल करताना दिसतो. तसेच तो राजकीय मुद्द्यांवरदेखील आपले मत मांडून चर्चेत येत असतो. तो अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजप(BJP)वर निशाणा साधताना दिसतो. मात्र आता त्याने मुस्लिमांनी ओवेसी यांना नाही तर शिवसेनेला मते दिले पाहिजे, असा सल्ला दिला आहे. कमाल आर खान (KRK)ची ही एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

केआरकेने ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने म्हटले की, महाराष्ट्रातील मुस्लिमांनी आभारी असले पाहिजे की त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. यामुळेच ते सन्मानाने जीवन जगताहेत. सर्व मुस्लिमांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मते द्यायला हवीत आणि भाजपाचे एजेंट असलेल्या ओवेसी आणि आझमी यांना मते दिली नाही पाहिजे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात रामनवमी निमित्ताने सुरु असलेल्या हिंसक प्रकरणारवर केआरकेने हे ट्वीट केल्याचे म्हटले जात आहे. केआरकेच्या या ट्विटवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटले की, कधी तुम्ही तर कधी शिवसेना, का त्रास देत आहात भावा. तुम्हाला मत द्यायचे नाही तर तुम्ही गुपचूप मदारीचा खेळ पाहा. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, आता राजकारण करणार का? हे सर्व सोड, तुम्ही रिव्ह्यूच करा. आणखी एका युजरने लिहिले की, जे काही २-४ टक्के मते वाचली आहेत. त्यांनादेखील तुम्ही संपवून टाका. 

टॅग्स :कमाल आर खानउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीभाजपा