संगीत दिग्दर्शक ओम प्रकाश सोनीक यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 12:46 IST
ज्येष्ठ संगीत दिग्दर्शन ओम प्रकाश सोनीक यांचे मुंबईतील एका खासगी रुग्णायलात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा, ...
संगीत दिग्दर्शक ओम प्रकाश सोनीक यांचे निधन
ज्येष्ठ संगीत दिग्दर्शन ओम प्रकाश सोनीक यांचे मुंबईतील एका खासगी रुग्णायलात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा, मुलगी आहे. त्यांना इंडस्ट्रीत ओमी नावाने ओळखले जात असे. त्यांनी त्याच्या कारकिर्दीची सुरुवात 1950च्या सुमारास केली. संगीत दिग्दर्शक मास्टर सोनीक यांचे ओम हे भाचे होते. त्या दोघांच्या सोनीक-ओमी या जोडीने जवळजवळ 125 चित्रपटांना संगीत दिले. ओमी हे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते. त्यानंतर त्यांना रुग्णायलात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळतच होती. सोनीक-ओमी यांनी सुरुवातीच्या काळात खूपच स्ट्रगल केला. काम मिळत नसल्याने ओमी कोरसमध्येदेखील गात असत. 50च्या दशकात ममता, मेहफिल, इश्वर भक्ती यांसारख्या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत प्रचंड गाजले आणि त्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य पालटले. महुया चित्रपटातील दोनो ने किया था प्यार मगर... हे गाणे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 2000 साली प्रदर्शित झालेला बिवी नं.2 हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट ठरला.