Join us  

हृतिक रोशनची केस क्राइम ब्रॅंचला ट्रान्सफर, कंगना म्हणाली - छोट्याशा अफेअरसाठी किती रडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 9:05 AM

हृतिक रोशनला २०१३ ते २०१४ दरम्यान १०० ई-मेल आले होते. सांगितले होते की, ई-मेल अभिनेत्री कंगना रणौतच्या ई मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते.

अभिनेता हृतिक रोशनची एक केस सायबर सेलकडून आता क्राइम ब्रॅंच इंटेलिजन्ट यूनिटला ट्रान्सफर करण्यात आला आहे. क्राइम ब्रॅंचचे प्रभारी आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी याचे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार हृतिक रोशनच्या एफआयआरवर तपास करण्यासाठी केस सायबर सेलकडून क्राइम ब्रॅंचच्या क्राइम इंटेलिजन्स यूनिटके देण्यात आली आहे.

काय होती तक्रार?

हृतिक रोशनला २०१३ ते २०१४ दरम्यान १०० ई-मेल आले होते. सांगितले होते की, ई-मेल अभिनेत्री कंगना रणौतच्या ई मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते. याबाबत हृतिक रोशनने २०१७ मध्ये सायबर सेलकडे एक तक्रार दिली होती. ई-मेल कंगनाच्या आयडीवरून आले होते. त्यावेळी कंगना म्हणाली होती की, तिचा ई-मेल आयडी हॅक झाला होता आणि तिने हृतिक रोशनला कोणताही ई-मेल केला नाही. याआधी २०१६ मध्ये हृतिक रोशनने अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. 

या प्रकरणात काहीच प्रोग्रेस न झाल्याने वरिष्ठ अधिवक्ता महेश जेठमलानी यांच्या कार्यालयाने नुकतंच ९ डिसेंबरला पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं होतं. पत्रात लिहिलं होतं की, आमच्या क्लाइंटने तपासात सहकार्य केलं आणि इलेक्ट्रॉनिक डिवाइसही दिला होता. पत्रात लिहिलं की, मॅजिस्ट्रेट कोर्टाने माझ्या क्लाइंटचे लॅपटॉप आणि फोन मागवण्याचे आदेश दिले होते. पण क्लाइंटला लॅपटॉप आणि मोबाइल परत मिळालेच नाही जे त्यांच्याकडून घेण्यात आले होते.

काय म्हणाली कंगना?

या केसच्या घटनाक्रमावर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने ट्विट केलं की, 'त्याची कहाणी पुन्हा सुरू झाली. आमच्या ब्रेकअप आणि त्याच्या डिवोर्सला इतके वर्षे होऊन गेले आहे. पण तो पुढे जाण्यास नकार देतोय. कोणत्याही महिलेला डेट करायला नकार देतो. बस जशीही मी माझ्या पर्सनल लाइफमध्ये काही मिळवण्यासाठी साहस करते तेव्हा तो पुन्हा तेच नाटक सुरू करतो. हृतिक रोशन कधीपर्यंत रडशील एका छोट्याशा अफेअरसाठी'. 

 

टॅग्स :हृतिक रोशनकंगना राणौतबॉलिवूड