मल्टीटास्कर पीसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 09:52 IST
काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रा हिला तिच्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ आणि हॉलीवूडपट ‘बेवॉच’ साठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
मल्टीटास्कर पीसी
काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रा हिला तिच्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ आणि हॉलीवूडपट ‘बेवॉच’ साठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिच्या उत्कृष्ट अभिनयाचा सन्मान म्हणून कामाची नोंद या माध्यमातून घेण्यात आली.पुरस्कार मिळाल्यानंतर तिने काही तिचे काम थांबवलेले नाही. तर जास्त प्रमाणात कामाला वाहून घेतले आहे. तिचा नुकताच एक फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. यात तिचा मेकअप करण्यासाठी जवळपास तीन ते चार तरूणी बसलेल्या आहेत.पीसी इतकी बिझी आहे की, ती मेकअप करत असतानाही लॅपटॉपवर काहीतरी काम पाहते आहे. वेल, पीसीला तर आता मल्टीटास्करच म्हणावे लागेल नाही का?