Join us  

मुलायम अन् उद्धव यांप्रमाणेच बॉलिवूडमध्येही घराणेशाही, मग नेपोटीझम कुठयं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:00 AM

अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेटोटीझमवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने सगळ्यांना धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सुरू असणाऱ्या नेपोटीझमचा हा मुद्दा चर्चेत आला आहे. सुशांतकडून काम काढून घेतले, त्याला इंडस्ट्रीत काडीची किंमत नसल्याची जाणीव आणि त्याला इंडस्ट्रीतून काढून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. करण जोहर आणि इंडस्ट्रीतील नेपोटिझमने सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं असा आरोप एका अभिनेत्रीने केला. मात्र, दिग्दर्शक राम गोपाल वर्माने हे नेपोटिझ्म सर्वच ठिकाणी असल्याचं म्हटलंय. 

अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेटोटीझमवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. बॉलिूवडमधील घराणेशाहीमुळेच सुशांतने आत्महत्या केल्याची टीका सोशल मीडियातून करण्यात येत असून काही दिग्दर्शकांना लक्ष्य करण्यात येत आहे. अभिनेत्री कंगना राणौतने दिग्दर्शक करण जोहरचे नाव घेऊन बॉलिवूडमधील गटबाजी सांगितली. कंगना राणौत हिने सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर करण इंडस्ट्रीतील काही लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतने मोठ मोठे सिनेमे केलेत़ पण त्याला एकही मोठा अवार्ड मिळाला नाही. इंडस्ट्रीत मुव्ही माफियांची मुळं खोलवर रूजली आहेत. सुशांत त्याचाच बळी ठरला, असे कंगनाने म्हटले आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तर, कुस्तीपटू बबिता फोगाटनेही करण जोहरवर निशाणा साधला आहे. त्यानंतर, सोशल मीडियातूनही खान कंपनी, करण जोहर आणि कपूर कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र, या सर्वांची पाठराखण करण्याचं काम दिग्दर्शक राम गोपाल वर्माने केलंय. 

रामगोपाल वर्माने आपल्या ट्विटरवरुन बॉलिवूडमधील नेपोटीझमला नाकारले असून सर्वच क्षेत्रात हेच सुरु असल्याचं म्हटलंय. राजकारणात उत्तर प्रदेशच्या मुलायमसिंह यादव, महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरेंनी काय केलं? आपल्या मुलांनाचं पुढे केलं ना, धीरुभाईंनीही त्यांची संपत्ती मुकेश आणि अनिललाच दिली ना, त्याचप्रमाणे सर्वच कुटुंबीय हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच प्राधान्य देत असतात. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील कुटुंबही तेच करत आहेत. मग, कुठे आलं नेपोटीझम? तिथं नाही का नेपोटीझम? असा प्रश्न दिग्दर्शक राम गोपाल वर्माने विचारला आहे.  

रामगोपाल वर्माने करण जोहर आणि बॉलिवूडमधील दिग्गज कुटुंबीयांची पाठराखण करत, नेपोटीझम हे सर्वच क्षेत्रात चालत असल्याचं सूचवलंय.  

टॅग्स :राम गोपाल वर्माउद्धव ठाकरेसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड