वास्तविक शाहरूख या इव्हेंटचा होस्ट होता. शाहरूख व्यतिरिक्त ईशा, अनंद आणि आकाशनेही हा इव्हेंट होस्ट केला. इव्हेंटमध्ये सर्वाधिक आकर्षक बाब राहिली ती अंबानी परिवारातील मुलांसोबत शाहरूखचा चिट चॅट. शाहरूखला त्याच्या बेस्ट ह्यूमर आणि इंटेलीजेंसीसाठी ओळखले जाते. त्यामुळे शाहरूख आणि मुलांमध्ये चांगलाच फनी इंटरअॅक्शन घडून आला. यावेळी अनंत अंबानीने शाहरूखला त्याच्या आयुष्यातील पहिल्या पगाराविषयी विचारले.
शाहरूखने अनंतच्या या प्रश्नाचे उत्तर देताना माझी पहिली सॅलरी ५० रूपये इतकी होती, असे सांगितले. तसेच अनंतला तुझी सॅलरी किती होती? असा प्रश्न विचारला. त्यावर अनंतने अतिशय चपळाईने उत्तर देताना म्हटले की, लीव इट, जर मी तुला माझी सॅलरी सांगितली तर कदाचित हे ऐकून तू अंबेरेस्मेंट होशील.