यूएईच्या सर्वात मोठ्या गल्फ न्यूज या वृत्तपत्राने श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीला प्रमुख जागा दिली. या वृत्तपत्राच्या वेबसाइटवर सुत्रांच्या हवाल्यानुसार लिहिले की, मुकेश अंबानी यांनी श्रीदेवी यांची डेड बॉडी भारतात आणण्यासाठी त्यांचे प्रायव्हेट जेट आॅफर केले आहे. वास्तविक या बातमीला अद्यापपर्यंत अधिकृतरित्या दुजोरा मिळाला नाही.
दरम्यान, श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी यांच्यासोबत ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या त्या हॉटेलचे नाव अमीरात टॉवर आहे. या हॉटेलला प्रसिद्ध हॉटेल चेन जुमॅरा ग्रुप आॅपरेट करतात. दरम्यान यूएईमध्ये असलेले इंडियन अॅम्बेसेडर नवदीप सिंग सूरी हे श्रीदेवीचे पार्थिव भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडत असल्याचे समजते. त्यांनी ट्विट करून श्रीदेवीच्या निधनावर दु:खही व्यक्त केले होते.