Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘एम एस. धोनी- दी अनटोल्ड स्टोरी’साठी ‘और थोडा इंतजार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 21:57 IST

नीरज पांडे यांचा ‘एम एस. धोनी- दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाची धोनीचे चाहते आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. टीम इंडियाचा ...

नीरज पांडे यांचा ‘एम एस. धोनी- दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाची धोनीचे चाहते आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन महेन्द्र सिंह धोनी याच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा येत्या २ सप्टेंबरला रिलीज होणार होता. मात्र ताज्या बातमीनुसार आता सिनेमाची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता हा सिनेमा २ सप्टेंबर नाही तर ३० सप्टेंबरला रिलीज होईल. रिलीज डेट लांबल्याने टीमला आणखी वेळ मिळेल आणि आम्ही एक अधिकाधिक उत्कृष्ट सिनेमा प्रेक्षकांपुढे ठेवू शकू, असे  मेकर्सनी एका निवेदनात म्हटले आहे. आम्ही चित्रपटासंदर्भात कुठलीही तडजोड स्वीकारायला तयार नाही, असेही यात म्हटले ओह. सुशांत सिंह राजपूत या चित्रपटात धोनीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तेव्हा और थोडा इंतजार...!! आणखी काय??