Join us  

'निर्लज्जासारखी मी वाट पाहात उभी राहायचे आणि...'; मृणाल ठाकूरने सांगितला स्ट्रगल काळातील किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:59 AM

Mrunal thakur: 'सुपर 30', ' बाटला हाऊस', 'धमाका' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेली मृणाल लवकरच जर्सी चित्रपटात झळकणार आहे.

उत्तम अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावरुन थेट रुपेरी पडद्यावर एन्ट्री करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) . २०१२ मध्ये 'मुझसे कुछ कहते हैं.. ये खामोशियां'  या मालिकेच्या माध्यमातून मृणालने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर 'कुमकुम भाग्य' (Kumkum Bhagya) मधून तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली यशाचा आलेख चढत असताना तिने 'लव सोनिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि तिचा फिल्मी प्रवास सुरु झाला. मात्र, तिचा हा प्रवास सोपा नव्हता.  एका मुलाखतीत तिने ऑडिशनच्या वेळी कोणकोणत्या गोष्टींचा सामना केलाय हे सांगितलं.

'सुपर 30', ' बाटला हाऊस', 'धमाका' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेली मृणाल लवकरच जर्सी चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यामध्येच एका मुलाखतीत तिने तिच्या स्ट्रगल काळावर भाष्य केलं.

"मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगत आहे. लोकांच्या मनापर्यंत मला पोहोचायचं आहे आणि मी तोच प्रयत्न करते. कुमकुम भाग्यने मला यासाठी खऱ्या अर्थाने मदत केली. लोकांचं निखळ मनोरंजन करणं हे एकच माझं उद्दिष्ट्य आहे", असं मृणाल म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मलाही संधी मिळाली त्यामुळे मी स्वत:ला फार नशीबवान समजते. खूप टीव्ही कलाकार आहेत जे या संधीची वाट पाहात आहेत. मी देखील ही संधी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले, मेहनत केली. मला खूप संघर्ष करावा लागला आहे. मी निर्लज्जासारखी ऑडिशनच्या रांगेत उभी राहायचे आणि जोपर्यंत माझा नंबर येत नाही तोपर्यंत तिथेच बसून राहायचे. मी खूप हट्टी होते आणि अजूनही तशीच आहे."

दरम्यान, मृणाल उत्तम अभिनयासह तिच्या स्वभावामधील नम्रपणामुळेही ओळखली जाते. त्यामुळे कलाविश्वात तिची कायमच चर्चा असते. विशेष म्हणजे मृणालने अल्पावधीत बॉलिवूडमध्ये तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

टॅग्स :मृणाल ठाकूरबॉलिवूडसेलिब्रिटीशाहिद कपूर