Join us

'मिस्टर इंडिया'मधील हे गाणं होणार रिक्रिएट, या गाण्यात दिसणार ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 13:45 IST

'मिस्टर इंडिया' चित्रपटातील हे प्रसिद्ध गाणं होणार नव्याने दाखल

नव्वदच्या दशकात अनिल कपूरश्रीदेवी यांचा प्रदर्शित झालेला चित्रपट 'मिस्टर इंडिया' आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. या चित्रपटातील पात्र, कथानक व गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता या चित्रपटातील एक गाणं नव्याने भेटीला येणार आहे. या गाण्याचं नाव आहे 'जिंदगी की यही रित है'. या गाण्यात झळकणार आहे अभिनेत्री अदिती गोवित्रीकर.

अदिती गोवित्रीकर लवकरच 'कोई जाणे ना' चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत कुणाल कपूर आणि अमायरा दस्तूरदेखील मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. याच चित्रपटात मिस्टर इंडिया चित्रपटातील जिंदगी की यही रित है हे गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे.

या चित्रपटाबद्दल अदिती म्हणाली की, चित्रपटाच्या कामाची सुरूवात मिस्टर इंडियामधील गाणं जिंदगी की यही रीत हैपासून झाले आणि या चित्रपटात मी दोन सुंदर मुलांची आईची भूमिका साकरत आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक अमीन हाजी आणि माझी मैत्री खूप पहिल्या पासून आहे आणि त्यांच्यासोबत एका चित्रपटात काम करण्याचे अनुभव खूप मजेशीर होता.

  कोई जाणे ना चित्रपटाच्या व्यतिरिक्त अभिनेत्री अदिती गोवित्रीकर किकू शारदा आणि हितेन तेजवानी सकट "ग्रे स्टोरीस" या वेबफिल्म मध्ये दिसणार आहे.

अदिती गोवित्रीकर फक्त एक अभिनेत्री नसून एक साइकॉलॉजिस्ट आहे. तिने काही बॉलिवूड सेलिब्रेटींना डिप्रेशनसारख्या मानसिक आजारातून बाहेर पडण्यास मदत केली आहे.

अदितीने दे दाना दन, पहेली, भेजा फ्राय आणि मराठी चित्रपट स्माईल प्लिज सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :श्रीदेवीअनिल कपूरकुणाल कपूर