अक्षय कुमारच्या गोल्डमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनी रायच्या हाती लागला करण जोहारचा हा चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 13:08 IST
अक्षय कुमारच्या गोल्डमधून मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे हे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. यानंतर मौनी रॉयच्या हाती आणखीन ...
अक्षय कुमारच्या गोल्डमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनी रायच्या हाती लागला करण जोहारचा हा चित्रपट
अक्षय कुमारच्या गोल्डमधून मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे हे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. यानंतर मौनी रॉयच्या हाती आणखीन एक मोठा चित्रपट लागला आहे. मौनी करण जोहरच्या ब्रह्मस्त्र चित्रपटात झळकणार आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. यात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट करण जोहर तीन भागांमध्ये रिलीज करणार आहे. 'ब्रह्मस्त्र' चा पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाईल.या चित्रपटासाठी रणबीरने घोडेस्वारी आणि जिम्नॅस्टिकची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात सुद्धा केली आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'ड्रॅगन' असे होते. अयान मुखर्जी भरपूर दिवसांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होते . ज्यामध्ये एक सुपरहिरो आहे आणि त्याच्याकडे अद्नभुत शक्ति आहे. या कथेला अनुसरून करण जोहरने या चित्रपटाचे नाव 'ब्रह्मस्त्र' असे ठेवले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर मौना रॉयची वर्णी लागली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ALSO READ : मौनी रायच्या ब्रेकअपची बातमी ठरली खोटी, बॉयफ्रेन्डसोबत असे केले झक्कास दिवाळी सेलिब्रेशन!सध्या मौनी गोल्ड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. गोल्डमध्ये मौनी अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे. गोल्ड आणि ब्रह्मस्त्रशिवाय आणखिन तिसरा चित्रपट मौनीच्या हाती लागण्याची शक्यता आहे. मौनीने छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात केली. नागिन ही तिची छोट्या पडद्यावरील मालिका खूपच गाजली.