Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतच्या दिग्दर्शनाखाली तयार होतोय 'हा' सिनेमा, उद्या रिलीज होणार ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 12:49 IST

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आता दिग्दर्शिकादेखील बनली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात कंगाना तिचा आगामी सिनेमा मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीचे दिग्दर्शन करते.

ठळक मुद्देकंगनाच्या मणिकार्णिकाचे ट्रेलर शुक्रवारी रिलीज होणार आहेया सिनेमाचे दिग्दर्शनदेखील आता कंगना करतेय

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आता दिग्दर्शिकादेखील बनली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात कंगाना तिचा आगामी सिनेमा मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीचे दिग्दर्शन करते. सिनेमाच्या सेटवरुन एका क्लिपबोर्डचा फोटोसमोर आला आहे त्यात दिग्दर्शक म्हणून कंगनाचे नाव लिहिले दिसतेय.  

कंगनाच्या फॅन्ससाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. कंगनाच्या मणिकार्णिकाचे ट्रेलर शुक्रवारी(उद्या) रिलीज होणार आहे. कंगनाच्या या सिनेमाचे दिग्दर्शन कृष करत होते. मात्र कंगानाला त्यांचे दिग्दर्शन काही कळले नाही. त्यानंतर कंगनाने सिनेमाच्या टीमशी बोलून स्वत: दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. मणिकर्णिका ट्रेलर रिलीज होण्याआधी #Manikarnika TeaserOutTomorrow हा हॅश टॅग ट्विटरवर आज ट्रेंड होतेय. सध्या या सिनेमाची शूटिंग कर्जतमधल्या एनडी स्टुडिओमध्ये सुरु आहे. 

कंगना राणौतचा हा अंदाज बघून ती आमिर खानच्या रस्त्यावर चालते असेच वाटतेय. आमिर खानने देखील 'तारे जमीन पर'च्या शूटिंग दरम्यान अमोल गुप्तेला बाजूला काढून स्वत:ला या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत आहे. कंगना राणावत ही राणी लक्ष्मीबाईंच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी कंगनाने खास तलवारबाजीचे धडेही गिरवले आहेत. तसेच ती या चित्रपटात अनेक स्टंट करताना दिसणार आहे. निर्मात्याला विश्वास आहे की प्रेक्षकांना ही सीन्स खूप आवडतील आणि प्रेक्षकांच्या नजरा कंगानवरुन हलणे अशक्य आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. तिच्याबरोबर अतुल कुलकर्णी एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाला ऐतिहासिक सिनेमात झाशीच्या राणी यांच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे मेकिंग बजेट 120 कोटींपेक्षा जास्त आहे. तेव्हाच 'मणिकर्णिका'साठी कंगनाने जवळपास 10 कोटी रुपये घेतले असून अभिनेत्रींमध्ये सगळ्यांत जास्त मानधन घेणा-या अभिनेत्रींच्या यादीत आता कंगनाचे नाव सामिल झाले आहे. 

टॅग्स :कंगना राणौतमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी