Join us

mothers day special : आईच्या प्रेमाची महती सांगणारी ही गाणी तुम्ही ऐकलीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2017 13:52 IST

बॉलिवूडच्या काही चित्रपटांची गाणी आईबद्दलचे अपार प्रेम व्यक्त करणारे आहेत. अशीच काही गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...

आज (१४ मे) मदर्स डे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे स्थान  आयुष्यात अनन्यसाधारण असेच आहे. आई म्हणजे, विश्वाची जननी. आज संपूर्ण जगभर मदर्स डे साजरा होत आहे. फिल्मी जगताबद्दल बोलाल तर आईचे प्रेम जाहिर करणारे अनेक चित्रपट आणि गाणी बनली आहेत. बॉलिवूडच्या काही चित्रपटांची गाणी आईबद्दलचे अपार प्रेम व्यक्त करणारे आहेत. अशीच काही गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...राजा और रंक़...तू कितनी अच्छी है....१९६७ मध्ये ‘राजा और रंक’ नामक चित्रपट आला. या चित्रपटात आईतील ‘तू कितनी अच्छी है....’ हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताचे बोल आनंद बख्सी यांचे आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी कम्पोज केलेल्य या गाण्याची आज मदर्स डे दिवशी आठवण झाल्याशिवाय राहत नाही.तारे जमीं पे - तेरी परवाह करता हूं मैं माँसन २००७ मध्ये आलेल्या ‘तारे जमीं पर’ या चित्रपटातील ‘ तेरी परवाह करता हूं मैं माँ’ हे गाणे शंकर महादेवन यांनी गायले आहे. अतिशय इमोशनल असलेले हे गाणे दर्शिल सफारी या बालकलाकारवर चित्रीत केले गेले आहे.दसविदानियां- प्यारी माँ मम्मी माँसन २००८ मध्ये आलेल्या ‘दसविदानियां’ या चित्रपटातील हे गाणे विनय पाठक आणि सरिता जोशी या दोघांनी गायले होते.नीरजा - ऐसा क्यों माँराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त ‘नीरजा’ या चित्रपटातील ‘ऐसा क्यों माँ’ हे गाणे सुनिधी चौहान हिने गायले आहे. या चित्रपटात सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती.दादी माँ - ए माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगीसन १९६६ मध्ये आलेल्या ‘दादी माँ’ या चित्रपटातील हे गाणेही आईच्या प्रेमाची महती सांगणारे असेच एक लोकप्रीय गाणे आहे.’