Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेहानच्या बर्थडेला आई सुझानचा मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 08:49 IST

सुझान आणि हृतिक रोशन यांचा मोठा मुलगा रेहान आता दहा वर्षांचा झाला आहे. 

सुझान आणि हृतिक रोशन यांचा मोठा मुलगा रेहान आता दहा वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त तिने एक सुंदर संदेश दिला आहे. हृतिक आणि ती जरी आता एकमेकांसोबत नसले तरी त्यांनी मुलांसाठी त्यांचे नाते कायम ठेवले आहे.तसेच हृतिकही त्याच्या मुलांसोबत अनेक वेळा वेळ घालवतांना दिसतो आहे. रेहानच्या १० व्या वाढदिवसानिमित्त तिने इन्स्टाग्रामवर अतिशय सुंदर संदेश दिला आहे. तिने लिहिले आहे की,‘ माय रेस्टार...शाईन ब्राईट माय सन...हॅपीएस्ट हॅप्पी १०. स्टे क्युरिअस अ‍ॅण्ड एक्स्प्लोअर अ‍ॅज द वर्ल्ड इज युअर्स.’तसेच ते सोबत काही अ‍ॅडव्हेंचर्स अ‍ॅक्टिव्हिटी करतांनाचे फोटो तिने अपलोड केले आहेत.