Join us  

Mother’s Day 2022 : सासू नव्हे आई..., विकी कौशल व कतरिना कैफची पोस्ट पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 4:20 PM

Mother’s Day 2022 : लग्न हे केवळ दोन व्यक्तिंचं होत नाही तर ते दोन कुटुंबाचं मिलन असतं. आज मदर्सच्या दिवशी बी-टाऊनचं मोस्ट पॉवरफुल कपल कतरिना कैफ व विकी कौशल यांनी नेमकं हेच सांगितलं.

Mother’s Day 2022 : लग्न हे केवळ दोन व्यक्तिंचं होत नाही तर ते दोन कुटुंबाचं मिलन असतं. आज मदर्सच्या दिवशी बी-टाऊनचं मोस्ट पॉवरफुल कपल कतरिना कैफ (Katrina Kaif ) व विकी कौशल (Vicky Kaushal ) यांनी नेमकं हेच सांगितलं. कतरिना व विकी दोघांनीही मदर्स डेच्या निमित्तानं खास पोस्ट शेअर केली. दोघांच्याही पोस्ट पाहून कुणाचंही मन भरून येईल. आई आपली असो वा आपल्या जोडीदाराची ती फक्त आई असते, हे कतरिना व विकी दोघांनीही सिद्ध केलं आहे.

मदर्स डेच्या दिवशी कतरिनाने एक तिच्या आईसोबतचा आणि एक सासूबाईसोबतचा  फोटो शेअर केला आहे. पहिल्या फोटोत कॅट तिच्या आईसोबत दिसतेय आणि दुसऱ्या फोटोत सासूबाईसोबत. कतरिनाने लग्नानंतर सासूबाईला पण आई मानलंय, हे तिच्या पोस्टवरून समजतं.

कतरिनाचा डियर हबी विकी कौशलही मागे नाही. त्यानेही आई आणि सासूबाईसोबतचे तीन सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिन्ही फोटोत त्याच्या लग्नातले आहेत. पहिल्या दोन फोटोत विकीची आई दिसतेय. पहिला फोटो वरातीचा आहे आणि दुसरा हळदीचा. तिसरा फोटो सर्वात खास आहे. यात विकी कौशल सासूबाई म्हणजेच कतरिनाच्या आईचे आशीर्वाद घेताना दिसतोय. विकीसोबत कतरिनाही फोटोत आहे. ‘मांवा ठंडिया छांवा’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

हे फोटो पाहून चाहते विकी व कतरिनाच्या प्रेमात पडले आहेत. सगळेच या कपलचं कौतुक करत आहेत. सगळ्यांनीच या कपलला भरभरून आशीर्वाद दिले आहेत.

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ