Join us  

बॉलिवूड कलाकारांचे सर्वात महागडे घटस्फोट, कुणी दिले बंगले तर कुणी दिले करोंडो रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 12:21 PM

काही कलाकारांना घटस्फोट चांगलंच महागात पडलं आहे. कारण काहींचं बॅंक बॅलन्स कमी झालं. चला जाणून घेऊया कोणत्या कलाकारांना किती द्यावी लागली पोटगी.....

गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूडमध्ये कलाकारांचे घटस्फोट चांगलेच गाजले. त्यांच्या वाद काय झाले याची तर चर्चा झालीच सोबतच घटस्फोटानंतर कलारांना आपल्या घटस्फोटीत पत्नीला किती पोटगी द्यावी लागली याचीही चर्चा झाली. याबाबतीत काही कलाकारांना घटस्फोट चांगलंच महागात पडलं आहे. कारण काहींचं बॅंक बॅलन्स कमी झालं. चला जाणून घेऊया कोणत्या कलाकारांना किती द्यावी लागली पोटगी.....

आमिर खान - रीना दत्ता

आमिर खान याने त्याची पहिली पत्नी रीना दत्तला 2002 मध्ये घटस्फोट  दिला. 'लगान' सिनेमाच्या शूटिंगवेळी आमिरची भेच किरण रावसोबत झाली. त्यानंतर आमिर आणि रीनाने घटस्फोट घेतला. रीनाने पोटगी म्हणून आमिरकडून 50 कोटी रूपये घेतले होते. 

आदित्य चोप्रा - पायल खन्ना

बॉलिवूडच्या इतिहासात या जोडीचा घटस्फोट सर्वात महागडा मानला जातो. आदित्यने पायलला काय दिलं याची अधिकृत माहिती जाहीर झाली नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार, आदित्यने पायलला जुहू परिसरातील एक फ्लॅट दिलाय ही माहिती आहे. आदित्यने नंतर 2014 मध्ये राणी मुखर्जीसोबत लग्न केले. 

सैफ अली खान - अमृता सिंह

सैफ आणि अमृताने लग्नाच्या 13 वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी घटस्फोट घेतला त्यावेळी सैफने अमृताला 7 कोटी रुपये पोटगी म्हणून दिले होते. 

हृतिक रोशन - सुजैन खान

हृतिकने बालपणीच्या मैत्रीसोबत लग्न केल्यानंतर चाहत्यांसाठी तो एक उदाहरण ठरला होता. पण लग्नाच्या 13व्या वाढदिवसाच्या दोन दिवसआधी त्यांनी घटस्फोट घेतला. 2014 मध्ये त्यांना घटस्फोट मिळाला. मीडिया रिपोर्टनुसार, हृतिकने पोटगी म्हणून सुजैनला पोटगी म्हणून 400 कोटी रूपये दिले होते. 

करिश्मा कूपर - संजय कपूर

लग्नाच्या काही वर्षांनी झालेल्या वादामुळे करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट झाला. सेटलमेंट म्हणून संजय कपूरने करिश्माला खार येथील फ्लॅट दिला. मुलं करिश्माकडे आहेत. करिश्माने संजयकडे 7 कोटी रूपयांची मागणीही केली होती. 

प्रभू देवा - राम लता

2009 मध्ये अभिनेता प्रभू देवा आणि अभिनेत्री नयनतारा यांची जवळीक वाढली होती. त्यानंतर प्रभु देवा आणि राम लता यांच्या दरी निर्माण झाली होती. 2010 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी प्रभुदेवाने राम लताला10 लाख रूपये रोख, दोन लक्झरी कार आणि 20 ते 25 कोटीं रूपयांची प्रॉप्रर्टी दिली होती. 

संजय दत्त आणि रिया पिल्लई

संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्माचा ब्रेन ट्युमरमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर संजयने रिया पिल्लई सोबत लग्न केले. 1998 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी संजय दत्तने रियाला पोटगी म्हणून 8 कोटी रुपये दिले होते. 

फरहान अख्तर - अधुना भबानी

अभिनेता फरहान अख्तर याने 16 वर्षांचा संसार केल्यानंतर अधुनापासून घटस्फोट घेतला. यावेळी अधुनाने फरहानकडे त्यांचं राहतं घर आपल्याकडे ठेवण्याची मागणी केली होती. हे घर 10 हजार स्क्वेअर फूट परिसरात असून बॅन्डस्टॅन्ड येथे आहे.  

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीघटस्फोट