Join us  

नवीन वर्षात 'हे' स्टारकिड्स अभिनयात पदार्पण करणार, कपूर कुटुंबातील लेकीकडे सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 1:12 PM

'द आर्चीज' सिनेमातून ३ स्टारकिड्सने यंदा अभिनयात पदार्पण केलं.

यंदाचं वर्ष बॉलिवूडसाठी खूपच खास ठरलं. 'पठाण', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', '12 फेल','बवाल' असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट आले. तसंच झोया अख्तरच्या 'द आर्चीज' सिनेमातून ३ स्टारकिड्सने यंदा अभिनयात पदार्पण केलं. शाहरुख खानची लेक सुहाना खान, श्रीदेवीची लेक खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांची सिनेसृष्टीत एन्ट्री झाली. आता पुढील वर्षी 2024 मध्ये आणखी काही स्टारकिड्स पदार्पण करायच्या तयारित आहेत. कोण आहेत ते?

स्टारकिड्समध्ये पहिलं नाव येतं ते सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan). इब्राहिमचा लूक अगदी त्याच्या वडिलांप्रमाणेच आहे. यावर्षी रिलीज झालेल्या करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात इब्राहिमने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. तर आता पुढील वर्षात इब्राहिम धर्मा प्रोडक्शनच्याच 'सरजमीन' सिनेमातून पदार्पण करणार आहे.  तसंच इब्राहिम आणि श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनाही मधल्या काळात उधाण आलं होतं. आता इब्राहिमने लुक्समुळे तर चाहत्यांना प्रेमात पाडलंच आहे पण अभिनयातही तो खरा उतरतो का हे 2024 मध्ये कळेल. 

या स्टारकिड्सच्या यादीत दुसरं नाव येतं ते रवीना टंडनची लेक राशा थडानीचं (Rasha Thadani). सध्या राशा थडानीचा आत्मविश्वास बघता ती नक्कीच स्टार बनेल अशी नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. राशा बॉलिवूड अभिनेत्याबरोबर नाही तर चक्क साऊथ सुपरस्टार रामचरणसोबत झळकणार आहे. हा तेलुगू सिनेमा असेल जो हिंदीतही डब केला जाईल. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. राशा दिसायला आई रवीना इतकीच सुंदर आहे. तिच्या डेब्यूची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

आपल्या फिटनेस आणि लुक्समुळे आणखी एका स्टारकीडने सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. ती म्हणजे अभिनेते संजय कपूर यांची लेक शनाया कपूर (Shanaya Kapoor). शनाया ही अनन्या पांडे, सुहाना खान, नव्या नवेली यांची खूपच खास मैत्रीण आहे. तिने मॉडेलिंग क्षेत्रात आधीच पदार्पण केले आहे तर काही जाहिरातीतही ती झळकली आहे. पुढील वर्षात तिचाही सिनेमा रिलीज होणार आहे. 

 

टॅग्स :इब्राहिम अली खानरवीना टंडनबॉलिवूडशनाया कपूर