Join us
Daily Top 2Weekly Top 5

हीरोपेक्षा जास्त मानधन फक्त ‘प्रियंकाला’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:04 IST

जगभरात स्त्री-पुुरुष समानतेबद्दल बोलले जाते. बॉलिवूडमध्येदेखील या विषयावर चित्रपट आहे. परंतु चंदेरी दुनियाच्या ‘कथनी’ आणि ‘करनी’मध्ये फरक आहे. बिनधास्त ...

जगभरात स्त्री-पुुरुष समानतेबद्दल बोलले जाते. बॉलिवूडमध्येदेखील या विषयावर चित्रपट आहे. परंतु चंदेरी दुनियाच्या ‘कथनी’ आणि ‘करनी’मध्ये फरक आहे. बिनधास्त अभिनेत्री कल्की कोचलिनने याबद्दल मस्त टिप्पणी केली आहे. ती म्हणते, हिंदी सिनेसृष्टीत हीरोपेक्षा जास्त मानधन केवळ प्रियंका चोपडाला मिळते. बाकी सर्व अभिनेत्रींना बॉलिवूडच्या दुटप्पी धोरणाला सामोरे जावे लागते.’ चित्रपटसृष्टीत महिलांप्रती कशा प्रकारे दुजा भाव बाळगला जातो याविषयी ती बोलत होती. स्वानुभव सांगताना ती म्हणाली, एका निर्मात्याला मी जेव्हा वय 30 सांगितले तेव्हा तो मला म्हणाला की अजुन फक्त पाच वर्षे माझे करियर बाकी आहे. स्त्री म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य अशी इथे धारणा आहे. हळूहळू का होईना पण आता महिलाप्रधान चित्रपट तयार होत आहे. हा बदल खराखरंच कौतुकास्पद आहे.