Join us

मोना डार्लिंगचा पहिला लूक प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 16:51 IST

वाशू भगनानी निर्मित आणि संजय सुरी, अंशुमन झा, दिव्या मेनन या अभिनेत्यांचा समावेश असलेल्या ‘मोना डार्लिंग’ या चित्रपटाचा पहिला ...

वाशू भगनानी निर्मित आणि संजय सुरी, अंशुमन झा, दिव्या मेनन या अभिनेत्यांचा समावेश असलेल्या ‘मोना डार्लिंग’ या चित्रपटाचा पहिला लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. मोना डार्लिंगच्या निमित्ताने वाशू भगनानी यांनी हॉरर चित्रपटाची निर्मिती केली आहे. पहिल्या लूकमध्ये एका मुलीचा हात दिसतो आहे. त्याच्या पार्श्वभागी सामाजिक माध्यमांचे चित्र दिसत आहे. एका महाविद्यालयाच्या परिसरात होणाºया रहस्यमयी मृत्यूच्या घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. या मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये केवळ एका गोष्टींची समानता असते. फेसबुकवर ‘मोना डार्लिंग’ नावाने आलेली फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केल्यानंतर काही सेकंदातच त्यांचा मृत्यू होतो. या प्रोफाईलच्या पाठीमागे कोण आहे? हे समजत नसल्याने दोन मित्र हे शोधून काढण्याची तयारी करतात. खुन्याला आणि त्याच्या एकंदर जाळ्याला हे मित्र कसे शोधतात हे चित्रपटात पाहता येईल. अंशुमन याच्या अनुसार ‘विक्कीची भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या खूप जवळची आहे. एका नायकाप्रमाणे वाटणारी आणि गेम, कोड यांच्यासंबंधातील अनेक गोष्टी मला पसंत आहेत.या चित्रपटात सुजाना मुखर्जी ही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.