Join us  

मिथुन चक्रवर्ती यांना पापा नाही तर नावाने हाक मारतात त्यांची मुलं, इंटरेस्टिंग आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 2:14 PM

होय, माझी मुलं मला पापा नाही तर मिथुन याच नावाने हाक मारतात, असा खुलासा मिथुनदा यांनी केला.

डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांची क्रेज अद्यापही कायम आहे. गत रविवारी मिथुन यांनी ‘सुपर डान्सर 3’मध्ये स्पेशल गेस्ट म्हणून हजेरी लावली आणि याचदरम्यान एक इंटरेस्टिंग खुलासाही केला. होय, माझी मुलं मला पापा नाही तर मिथुन याच नावाने हाक मारतात, असा खुलासा मिथुनदा यांनी यावेळी केला. मला तीन मुले आणि एक मुलगी अशी चार मुल आहेत. या चौघांनी मला कधीच पापा वा डॅडी म्हणून हाक मारली नाही. मिथुन याच नावाने ते मला बोलवतात, असे त्यांनी सांगितले. साहजिकच,‘सुपर डान्सर 3’च्या सेटवरच्या प्रत्येकाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. असे का? असा प्रश्न अनेकांना पडला.

मिथुनदांनी त्याचेही उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, माझा मोठा मुलगा मिमोहचा जन्म झाला, तेव्हा चार वर्षांपर्यंत तो बोलू शकत नव्हता.तो फक्त एक-एक अक्षर बोलायचा. एकदा आम्ही त्याला मिथुन म्हणालया लावले आणि त्याने मिथुन म्हटले. आम्ही डॉक्टरांना ही गोष्ट सांगितली, तेव्हा तेही अवाक् झालेत. त्याला मिथुन म्हणून द्या, त्याला प्रोत्साहन द्या, असे आम्हाला डॉक्टरांनी सांगितले. पुढे मिमोह चांगला बोलू लागला. पण पापाऐवजी तो मला मिथुन म्हणू लागला. शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतरही तो मला मिथुन या नावाने हाक मारायचा.  मिमोहनंतर त्याचे इतर भावंडही त्याच्याप्रमाणे मला मिथुन बोलायला लागले. मग मुलगी आली. हे तिघे पापा म्हणत नाही, मग मीच का पापा म्हणू? असे म्हणून तिनेही मला मिथुन बोलवणे सुरु केले. त्यामुळे आजही माझी मुलं मला मिथुन याच नावाने बोलवतात. आमच्यात मैत्रीचे सुंदर नाते आहे..

टॅग्स :मिथुन चक्रवर्तीसुपर डान्सर