Join us

किशोर कुमार यांच्या तिसऱ्या पत्नीच्या प्रेमात पडला होता मिथुन, नंतर त्यांनी गायकाने असा घेतला होता बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 11:09 IST

24 वर्षीय योगिता बाली 47 वर्षीय किशोर कुमारच्या प्रेमात पडली. किशोर कुमार यांनाही ती आवडत होती.

असं म्हणतात की, प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात....प्रेम हे आंधळं असतं. प्रेमात पडलेल्या लोकांना कशाचीही चिंता नसते. बॉलिवूडमधील तर अनेक रिअल लाइफ लव्हस्टोरी खूप फेमस आहेत. अशीच एक लव्हस्टोरी 80च्या दशकात गाजली होती. हा लव्ह ट्राएंगल होता किशोर कुमार, योगिता बाली आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यातील होता. 24 वर्षीय योगिता बाली 47 वर्षीय किशोर कुमारच्या प्रेमात पडली. किशोर कुमार यांनाही ती आवडत होती. किशोर कुमार यांची आज पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊया हा किस्सा. 

हा काळ तेव्हाचा होता जेव्हा किशोर कुमार मोठे स्टार झाले होते. त्यांचं करिअर यशाच्या शिखरावर होतं. पण त्यांच्या खाजगी आयुष्यात काही अडचणी सुरू होत्या. किशोर कुमार यांनी पहिली पत्नी रूमाकडून घटस्फोट घेतल्यावर अभिनेत्री मधुबालासोबत लग्न केलं. पण हे लग्न मधुबालाची शेवटची इच्छा म्हणून केलं होतं. मधुबाला आजारी झाल्यावर ती 9 वर्षे बेडवर पडून होती. किशोर कुमार यांनी तिची खूप काळजी घेतली.

मधुबालाच्या निधनानंतर किशोर कुमार यांच्या आयुष्यात योगिता बाली आली होती. योगिता बालीने 1971 मध्ये अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्‍न सिन्‍हा यांच्यासोबत ‘परवाना’सिनेमातून डेब्यू केलं होतं. 24 वर्षीय योगिता किशोर कुमार यांच्या प्रेमात पडली. मग काय, दोघांनी 1976 मध्ये लग्न केलं. हे लग्न कुटुंबियांच्या विरोधानंतर झालं होतं. सोबतच इंडस्‍ट्रीलाही धक्का देणारं होतं. पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. 1976 मध्ये झालेले हे लग्न 1978 मध्ये संपुष्टात आलं. 

योगिता बालीला यादरम्यान आधार मिळाला तो मिथुन चक्रवर्ती याचा. दोघांची भेट ‘ख्‍वाब’सिनेमाच्या सेटवर झाली होती. दोघेही यादरम्यान जवळ आले. दोघांचं प्रेम इतकं वाढलं की, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी अनेक सिनेमात सोबत काम केलं.

योगिताने किशोर कुमार यांची साथ सोडून मिथुनचा हात धरला आणि त्यांनी 1979 मध्ये लग्न केलं. योगिताआधी मिथुन एका परदेशी मॉडलच्या प्रेमात होता. मिथुनने हेलेना या मॉडलसोबत लग्नही केलं. पण हे लग्न केवळ सहा महिने टिकलं. शेवटी मिथुन आणि योगिताने लग्न केलं आणि ते एक झाले. पण तिसरी पत्नी अशी सोडून गेल्याने किशोर कुमार फार बिथरले.योगिता यांच्या लग्नाचा किशोर कुमार यांना चांगलाच धक्का बसला होता असे म्हटले जाते. इतके की, त्यांच्या लग्नानंतर किशोर कुमार यांनी मिथुनसाठी पुन्हा कधी गाणं गायलं नाही.

टॅग्स :किशोर कुमारमिथुन चक्रवर्ती