या एपिसोडमध्ये करण आणि मितालीशी शाहरूख संवाद साधणार आहे. परंतु शोमध्ये यासाठी मिताली आणि करणला शाहरूखची चांगलीच प्रतीक्षा करावी लागली. सेटवर शाहरूख तब्बल ३ ते ४ तासांनी उशिरा आल्याने या दोघांचा संताप झाला नसेल तरच नवल. मात्र जेव्हा शाहरूख सेटवर आला तेव्हा या दोघांनी काही बोलण्याअगोदर शाहरूखनेच त्यांची माफी मागितली. त्याचबरोबर तुम्हाला माझ्यामुळे तीन ते चार तास येथे प्रतीक्षा करावी लागल्याने मला दु:ख होत असल्याचेही शाहरूखने अगोदरच स्पष्ट केले.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, शाहरूखने मिताली राजची मनापासून माफी मागितली. तो मितालीला भेटला आणि तिला उशिरा येण्याचे त्याने कारण सांगितले. यावेळी शाहरूखने तिला सेटवर स्पीच देण्यासाठी मदतही केली. शाहरूखने मितालीला कम्फर्टेबल करण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले. त्याचबरोबर शाहरूखने हेही दाखवून दिले की, तो खºया अर्थाने जेंटलमॅन आहे. दरम्यान, शाहरूख सध्या आनंद एल राय यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरूख डबल रोल करणार आहे.