Join us

मम्मी-पप्पासोबत केक कापताना दिसली चिमुकली मीशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 20:14 IST

काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची लाडकी मीशा हिचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. शाहिदने ...

काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची लाडकी मीशा हिचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. शाहिदने मीशाचा वाढदिवस मुंबईत नव्हे तर लंडनमध्ये साजरा केला. आपल्या लाडकीचा पहिलाच बर्थ डे असल्याने या दाम्पत्याने तो जल्लोषात साजरा करण्यासाठी कुठलीच कसर सोडली नाही. शाहिद आणि मीरा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत खूपच वेगळ्या विचाराने वावरतात. त्यामुळेच त्यांनी मीशाच्या वाढदिवसाचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. अशातही मीशाचा एक फोटो आमच्या हाती लागला असून, त्यामध्ये पप्पा शाहिद कपूर आणि मम्मी मीरासोबत चिमुकली मीशा केक कापताना दिसत आहे. हा क्षण शाहिद आणि मीरासाठी खूपच अविस्मरणीय आहे. कारण दोघेही आपल्या लाडकीसोबत केक कापताना खूपच उत्साहित असल्याचे दिसत आहेत. वास्तविक शाहिद त्याच्या चिमुकलीचा पहिला वाढदिवस मुंबईत साजरा करू शकत होता. परंतु त्याने लंडनमध्ये वाढदिवस साजरा करून तो आणखी अविस्मरणीय बनविला. काही दिवसांपूर्वीच मीराने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘मी माझ्या मुलीचा वाढदिवस खूपच साध्या पद्धतीने साजरा करू इच्छिते. यावेळी केवळ माझ्या आणि शाहिदच्या परिवारातील लोक उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर काही जवळच्या मित्रांनाही आमंत्रित केले जाणार आहे.’कालच मीशाचा आणखी एक फोटो मीडियामध्ये व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती तिच्या आजीसोबत शॉपिंग करताना बघावयास मिळाली. मीशाला गॉगल्स खूप आवडतात. त्यामुळे ती गॉगल्सच्या काउंटरवर कलरफुल गॉगल्स न्याहाळताना दिसत होती. असो, शाहिद त्याच्या मुलीविषयी खूपच प्रोटेक्टिव्ह आहे. एका मुलाखतीत त्याने म्हटले होते की, ‘आम्ही एखाद्या मुलाला भेटलो की, मीशाला सांगत असतो की, तुझ्या मोठ्या भावाला हॅलो म्हण.’ असो, चिमुकल्या मीशाला ‘सीएनएक्समस्ती’ परिवाराकडून पहिल्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा!