Join us

मिर्झाचा ट्रेलर खास सलमानसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 13:40 IST

आयफा पुरस्कार सोहळ्याच्या पत्रकार परिषदेच्यावेळी हर्षवर्धन कपूरच्या मिर्झा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचनंतर कार्यक्रमाचा ...

आयफा पुरस्कार सोहळ्याच्या पत्रकार परिषदेच्यावेळी हर्षवर्धन कपूरच्या मिर्झा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचनंतर कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आयफाच्या सगळ्या प्रायोजकांना सेलिब्रेटींसोबत मंचावर बोलवत होता. त्यातील काही सेलिब्रेटी मंचावर आलेदेखील होते. पण त्यांना सगळ्यांना सलमान खानमुळे पुन्हा मंचावरून खाली जावे लागले. सूत्रसंचालकांनी सगळ्यांना मंचावर येण्याची विनंती केली, त्यातील काही मंडळी आली, तर काही येथेच होती. तितक्यात सलमानने सूत्रसंचालकाला मध्येच थांबवले आणि मिर्झा या चित्रपटाचा ट्रेलर पुन्हा सुरू करायला सांगितले. सलमान पत्रकार परिषदेला उशिरा आल्यामुळे त्याला मिर्झाचा ट्रेलर पाहाता आला नव्हता आणि त्याला तो ट्रेलर पाहाण्याची खूप इच्छा होती. सलमानने ट्रेलर पुन्हा सुरू करायला सांगितल्यावर त्याचे कोणी ऐकणार नाही असे होईल का? खास सलमानसाठी मिर्झा या चित्रपटाचा ट्रेलर पुन्हा सुरू करण्यात आला. ट्रेलर पाहून सलमान खूपच खूश झाला. अनिल कपूर तुझ्या मुलाने किती चांगला अभिनय केला आहे या शब्दांत त्याने अनिलकडे हर्षवर्धनचे कौतुक केले. या ट्रेलर संपल्यावर सगळे सेलिब्रेटी आणि प्रायोजक पुन्हा मंचावर आले.