Join us

मीराने ठेवले शाहीदचे नवे नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 09:55 IST

 शाहीद कपूर आणि मीरा राजपूत हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. ‘शमिरा’ हे इंडस्ट्रीतील सर्वांत लव्ही-डव्ही कपल आहे. सध्या ...

 शाहीद कपूर आणि मीरा राजपूत हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. ‘शमिरा’ हे इंडस्ट्रीतील सर्वांत लव्ही-डव्ही कपल आहे. सध्या शाहीद विशाल भारद्वाज यांचा आगामी चित्रपट ‘रंगून’ साठी शूटिंग करत आहे.यात तो नवाब मलिक यांची एक  मुस्लिम भुमिका साकारत आहे. आता मीराने त्याला या नव्या नावानेच बोलवायला सुरूवात केली आहे. तिने चक्क त्याला ‘नवाब’ नावानेच आवाज द्यायला सुरूवात केली आहे. बरं, आता हे नवे नाव कुठेतरी ऐकले आहे का? तर हो.करिनाही सैफला ‘नवाब’ या नावानेच हाक मारते. सैफ अली खान चाहत्यांमध्ये ‘छोटे नवाब’ म्हणून प्रसिद्ध आहे तर पतौडीचा १० वा नवाब म्हणून सैफ ओळखला जातो.