Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘खान’ आडनाव लावल्याने संतापली मलाइका अरोरा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 18:53 IST

तब्बल १८ वर्षं संसार केल्यानंतर गेल्या ११ मे रोजी अरबाज खान अन् मलाइका अरोरा विभक्त झाले. न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला ...

तब्बल १८ वर्षं संसार केल्यानंतर गेल्या ११ मे रोजी अरबाज खान अन् मलाइका अरोरा विभक्त झाले. न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिल्यानंतर या दोघांनीही आता आपापल्या वाटा निवडल्या आहेत. मलाइका तर एवढी विभक्त झाली की, तिला तिच्या नावासमोर खान लिहिणेही अजिबात आवडत नसल्याचे दिसून येत आहे. याचा प्रत्यय नुकताच बघावयास मिळाला. जेव्हा मलाइका एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती, तेव्हा तिच्या नावासमोर ‘खान’ असे लिहिले होते. मग काय, हे बघून मलाइका चांगलीच लालबुंद झाली. तिने आपला संपूर्ण राग आयोजकांवर काढला. मलाइकाचा अवतार बघून आयोजकही बिथरले. त्यांनी लगेचच मलाइकाच्या नावासमोर ‘खान’ नाव हटविले. गेल्या वर्षी मलाइका अन् अरबाजच्या संबंधांमध्ये फारसा गोडवा राहिला नव्हता. त्यांच्यात कुठल्या ना कुठल्या कारणाने सातत्याने वाद होत होते. अखेर नोव्हेंबर २०१६ मध्ये या दाम्पत्याने बांद्रा येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने गेल्या ११ मे रोजी यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. वास्तविक घटस्फोटाच्या एक दिवस अगोदर हे दोघेही जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचले होते. तेव्हा त्यांच्याकडे बघून हे दाम्पत्य खूश असल्याचे दिसत होते. परंतु दुसºयाच दिवशी न्यायालयाने निर्णय दिल्याने यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आला. असो, मीडिया रिपोटर््सने दिलेल्या माहितीनुसार, मलाइका घटस्फोटानंतर एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी नेमप्लेटवर तिच्या नावासमोर ‘मलाइका अरोरा-खान’ असे लिहिले होते; मात्र ही बाब मलाइकाला अजिबात आवडली नाही. तिने लगेचच आयोजकांना याविषयी जाब विचारला. माझ्या नावासमोर ‘खान’ असा उल्लेख केला जाऊ नये असे तिने ठणकावून सांगितले. तसेच आयोजकांच्या या कृत्यावर नाराजीही व्यक्त केली. आयोजकांनी तातडीने नेमप्लेटवरून ‘खान’ नाव हटवित मलाइकाची समजूत काढली. वास्तविक पाहता अजूनही मलाइकाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे नाव ‘मलाइका अरोरा-खान’ असेच आहे. शिवाय न्यायालयाच्या निर्णयानंतरही हे दोघे बºयाच ठिकाणी एकत्र फिरत आहेत. जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टला हे दोघेही एकत्र आले होते. शिवाय मॉरिशस येथे अरबाज भाचा आहिलच्या बर्थडे पार्टीत मलाइका सहभागी झाली होती. यावेळी दोघांनीही याठिकाणी क्वॉलिटी टाइम स्पेंड केला. तसेच गोवा येथे बहीण आणि आईबरोबर सुट्या एन्जॉय करीत असलेल्या मलाइकाबरोबर अरबाज उपस्थित असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे हे दोघे विभक्त होणार नाही, असाच अंदाज सगळ्यांकडून वर्तविला जात होता. असो, आता हे दोघे कायदेशीररीत्या विभक्त झाले असून, दोघेही त्यांच्या मार्गावर लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, मलाइकाने अरबाजकडे पोटगीपोटी १५ कोटी रुपयांची मागणी केली होती. अर्थात या बातमीला अद्यापपर्यंत पुष्टी मिळाली नाही. वृत्तानुसार मलाइका अरबाजकडून १० कोटी रुपयांपेक्षा एक रुपयाही कमी घेण्यास तयार नाही; मात्र अरबाजने मलाइकाला १५ कोटी रुपये देऊ केल्याचे समजते. तसेच मुलाच्या नावे एक फ्लॅटही घेतल्याची माहिती समोर येत आहे.