अनुष्का व विराट दोघेही आयफा अवार्ड सोहळ्यासाठी न्यूयॉर्कला गेले आहेत. मग यापेक्षा एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी दुसरी कुठली बरे असू शकते? एकमेकांसोबत निवांत क्षण घालवत असतानाचा एक सेल्फी विराटने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मग काय, काही क्षणातच हा सेल्फी व्हायरल झाला अन् बघता बघता त्याला हजारो लाइक्स आलेत. हा सेल्फी शेअर करताना विराटने पुन्हा एकदा अनुष्कावरील आपल्या प्रेमाची कबुलीही दिली. ‘माझ्या प्रेमासोबत खूपच गरजेच्या ब्रेकवर’, असे विराटने लिहिले. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरचा आणखी एक फोटोही त्याने शेअर केला. त्यात विराटच्या हाती छत्रीही दिसतेय. एकंदर काय तर अनुष्का व विराट दोघेही सध्या धम्माल मस्ती करताहेत.
यापूर्वी याच महिन्यात विराट व अनुष्का बेंगळुरूमध्ये एकत्र लंच डेट एन्जॉय करताना दिसले होते. त्यांच्या या फोटोलाही हजारो लाईक्स मिळाले होते.
विराट व अनुष्का या दोघांमध्ये २०१३ पासून अफेअर सुरु आहे. २०१५ च्या सुरुवातीला दोघांचेही ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. मात्र यानंतर मार्च २०१६ मध्ये दोघेही एकत्र दिसले आणि यांच्या प्रेमाच्या चर्चा पुन्हा होऊ लागल्या. गत वर्षी दोघांनीही डेहराडून येथे नाताळ साजरा केला होता. युवराज सिंह व हेजल किच हे दोघे त्यांचे खास अतिथी होते. यावर्षी मे महिन्यात जहिर खान व सागरिका घाटगे यांच्या साखरपुड्याला दोघेही लव्हबर्ड्स एकत्र पोहोचले होते.