Join us

आपल्या मम्मी-पप्पांसोबत मीशाने कापला केक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:36 IST

काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लाडकी लेक मीशा हिने आपला पहिला बर्थ डे सेलिब्रेट केला आहे. ...

काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लाडकी लेक मीशा हिने आपला पहिला बर्थ डे सेलिब्रेट केला आहे. शाहिद मीशाचा पहिला बर्थ डे  मुबंईत नाही तर लंडनला जाऊन सेलिब्रेट केला आहे. आपल्या मुलीच्या पहिला बर्थ डे  साजरा करण्यात त्याने कोणतीच कसर सोडली नाही. शाहिद आणि मीरा आपली खासगी आयुष्य नेहमीच थोडे पर्सनल ठेवतात. त्यामुळेच कदाचित मिशाच्या पहिल्या बर्थ डे त्यांनी सोशल मीडियापासून लांबच ठेवला आहे. बॉलिवूड लाईफलने आपल्या वेबसाईटवर मीशाचा मम्मी-पप्पांसोबतचा केप कापतानाचा फोटो टाकला आहे. यात मीशा केप कापताना खूपच एक्साईटेड दिसते आहे.अर्थातच हा मोमेंट शाहिद आणि मीरासाठी खूपच स्पेशल असणार यात काही शंका नाही. शाहिदला हवे असते तर त्याला मुंबईत राहुनसुद्धा मीशाचा बर्थ डे सेलिब्रेेेेट करता आला असता मात्र त्याला लेकीचा हा वाढदिवस खास बनवायचा होता. 
एका इंटरव्ह्यु दरम्यान मीराने सांगितले होते कि आपल्या मुलीचा बर्थ डे तिला अतिशय साध्या पद्धतीने सिलिब्रेट करायचा होता. मीशाचा बर्थ डे पार्टीत शाहिदचे कुटुंबीय आणि मीराच्या कुटुंबीयांसह काही जवळचे मित्र उपस्थित होते. सोशल मीडियावर मीशाचा आजीसोबत शॉपिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती गॉगल्सच्या काऊंटरसमोर उभी दिसते आहे. 
सध्या शाहिद त्याच आगामी चित्रपट पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र या व्यस्त शेड्यूलमधून ही त्यांने आपल्या लेकीच्या पहिल्या बर्थ डेसाठी वेळ काढला. मीरा आणि शाहिद मीशासह बर्थ डेच्या एक आठवडाआधीच लंडनला रवाना झाले होते. लंडनमध्ये मीशाचे पप्पा शाहिदसोबत खेळतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.