Join us  

#MeToo: करण जोहर, शबाना आझमी कुठे आहेत? कंगना राणौतचा रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 12:18 PM

‘मीटू’ निमित्ताने कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरवर निशाना साधला आहे..

मीटू’चळवळीने अनेक वादांना तोंड फोडले असताना यानिमित्ताने काही जुन्या वादांचीही नव्याने चर्चा रंगतेय. असाच एक जुना वाद म्हणजे, अभिनेत्री कंगना राणौत आणि दिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांच्यातला. गतवर्षी करण व कंगनाचा वाद चांगलाच गाजला होता. कंगनाने करणवर घराणेशाहीचा आरोप करत त्याला ‘मुव्ही माफिया’ म्हटले होते. कंगनाचा हा घाव करणला इतका आरपार लागला होता की, अद्यापही त्याच्या वेदना तो विसरू शकलेला नाही. आता ‘मीटू’ निमित्ताने कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरवर निशाना साधला आहे. ही मोहिम अशीच यशस्वी होणार नाही. बॉलिवूडच्या ए लिस्ट स्टार्सलाही या मोहिमेत उतरावे लागेल. करण जोहर सारखी माणसं जिम लूक आणि एअरपोर्ट लूकबद्दल दिवसांतून १० ट्विट करतात. पण ‘मीटू’ एकही नाही. केवळ एकच व्यक्ती ओरडून फायदा नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीत मोठ्या परिवर्तनातून जात असताना करण जोहर, शबाना आझमी सारखी माणसं कुठे आहेत? असा सवाल कंगनाने केला.

 करणच्या टॉकशोचा प्रोमो मी पाहिला आहे. यावेळी या शोमध्ये नेहमीप्रमाणे याहीवेळी तोच वात्रटपणा होणार आहे. कोण कुणासोबत झोपतो, कुणासोबत नाही? असेच तो म्हणतोय़ जे पुरूष कपड्यांप्रमाणे महिला बदलतात, त्यांची प्रशंसा कशासाठी? महिलांना आपण बॉबी डॉल बनवून टाकले आहे. मी करिअर सुरू केले, तेव्हा मी केवळ १७ वर्षांची होते. तेव्हापासून बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या कोण कुणासोबत झोपतो, एवढ्याच गॉसिप्स मी ऐकतेय. पण आता हे बदलायला हवे. ही मानसिकता बदलण्याची, पुढे जाण्याची योग्य वेळ आहे. स्वत:ला पत्नीव्रता सांगून बाहेर नाही नाही ते करणाºया पुरूषांचा खरा चेहरा समोर यायलाच हवा. मी कुणाला जज करत नाहीये. सर्व माझे मित्र आहेत. पण आता या मुद्यावर मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे, असेही कंगना म्हणाली. लैंगिक शोषण, गैरवर्तनात दोषी असलेल्यांसोबत यापुढे काम न करण्याचा निर्णय मी घेतला आहे, असेही तिने सांगितले.आता कंगनाचा हा वार करणच्या आणखी किती जिव्हारी लागतो, ते बघूच.

टॅग्स :कंगना राणौतकरण जोहरमीटू