Join us

तैमूर अली खानला मागे टाकत मीशा कपूरला मिळाली ही मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 11:14 IST

करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर हा स्टार किड्सच्या यादीत सगळ्यातवर आहे. तैमूरची एक झलक टिपण्यासाठी मीडियाचे ...

करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर हा स्टार किड्सच्या यादीत सगळ्यातवर आहे. तैमूरची एक झलक टिपण्यासाठी मीडियाचे कॅमेरे नेहमी तयारच असतात. तैमूरप्रमाणेच शाहिद कपूर आणि मिरा राजपूत यांची मुलगीदेखील मीशा देखील तेवढीच लोकप्रिय आहे. तैमूर आणि मीशाचे फोटो रोजच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याच्या आई-वडिलांप्रमाणे ते ही स्टार बनले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.       मिड-डेच्या रिपोर्टनुसार मीशाची वाढती लोकप्रियता बघून तिला एक लहान मुलांच्या ब्रँडने अॅडमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शाहिदने ही अॅडची ऑफर नाकारली आहे. मिड-डेच्या रिपोर्टनुसार, जेव्हा मीराकडे ही ऑफर आली तेव्हा ती खूप उत्साहित होती. शाहिदला कदाचित वाटले असेल मीशाला ऐवढ्या लहान वयात कॅमेरासमोर आणून तिचे बालपण हिरावून घेतल्यासारखे होईल म्हणून त्यांने ही ऑफर नाकारली असेल.    नुकत्याच एका इंटरव्ह्रु दरम्यान बोलताना शाहिद म्हणाला होता की, मीशाला त्याला मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर ठेवायचे आहे. तिला बिचारीला माहिती ही नाही तिचे फोटो का काढले जातायेत. शाहिद सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बत्ती गुल मीटर चालू’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. उत्तराखंडमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. आपल्या वाढदिवसासाठी शूटिंगमधून वेळ काढून शाहिद मुंबईत आला आहे. 'बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट वीज चोरीवर आधारित आहे. वीज कंपनीच्या पायºया झिजवणाºया सामान्य माणसाची कथा यात दिसणार असल्याचे कळते. शाहिदची पत्नी मीरा कपूर हिला या चित्रपटाची कथा भलतीच आवडली होती आणि तिनेच या चित्रपटासाठी शाहिदला राजी केल्याचे मानले जाते. या चित्रपटात अभिषेक बच्चनही लहानशा भूमिकेत दिसणार असल्याची खबर आहे. या चित्रपटात अभिनेत्रीची भूमिकाही शाहिद कपूरच्याच तोडीची असल्याचे कळतेय. यात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर आणि यामी गौतम झळकणार आहेत.