Join us
Daily Top 2Weekly Top 5

​टायगरला भेटण्यासाठी ‘त्या’ घरातून पळाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 17:58 IST

बॉलिवूड स्टार्सच्या एकापेक्षा एक क्रेझी फॅन्सचे अनेक किस्से तुम्ही याआधीही ऐकले असतीलच. आता अशीच एक घटना समोर आली आहे. ...

बॉलिवूड स्टार्सच्या एकापेक्षा एक क्रेझी फॅन्सचे अनेक किस्से तुम्ही याआधीही ऐकले असतीलच. आता अशीच एक घटना समोर आली आहे.  बॉलिवूडचा नवा स्टार टायगर श्रॉफ याच्यावर प्रेम करणाºया दोन किशोरवयीन मुली टायगरला भेटण्याच्या इच्छेने थेट घरातून पळून गेल्या. होय, या दोन्ही मुली उत्तरप्रदेश, मथुरेतील खामनी गावाच्या आहेत. मंगळवारी रात्री मुंबईला जाण्याच्या इराद्याने त्या घरून पळाल्या. अर्थात रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी या दोघींनाही ताब्यात घेतले. १४ वर्षांची रवीना आणि १७ वर्षांची प्रीती अशी या दोघींची नावे आहेत. या दोघीही जिवलग मैत्रिणी आहेत शिवाय टायगरच्या के्रझी फॅन्स आहेत. अलीकडे दोघींनीही टायगरच्या ‘बागी’ चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि यानंतर या दोघींनी टायगरला भेटण्यासाठी मुंबईला पळून जाण्याचा प्लॅन बनवला. रात्री ११ च्या सुमारास २० हजार रुपए घेऊन या दोघी घरातून निघाल्या. साडे बारापर्यंत परतल्या नाही, हे पाहून या दोघींच्या पालकांनी पोलिसांना सूचना दिली. या दोघींचा शोध घेता घेता पहाटेचे ६ वाजले. पण शेवटी त्या मिळाल्या. खरचं, पे्रम आंधळ असतं, ते असचं...