Join us  

एखाद्या अभिनेत्यालाही लाजवेल इतका हँडसम आहे कॅटरिना कैफचा बॉडीगार्ड, सिनेमाच्याही मिळतात ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 5:35 PM

कतरिना कैफच्या बॉडीगार्डचे नाव दीपक सिंह असून त्याच्या समोर बॉलिवूडचे अभिनेतेही फिके पडतील अशी त्याची पर्सनालिटी आहे.

कतरिना दीर्घ काळापासून सिनेसृष्टीत कार्यरत आहे. सिनेमांसोबतच मॉडेलिंग आणि जाहिरातींच्या माध्यमातून कतरिनाची कमाई होते. रिपोर्ट्सनुसार, कतरिनाकडे सुमारे 64 कोटींची संपत्ती असल्याचे बोलले जाते. कतरिना कैफची लोकप्रियता बघता गर्दीच्या ठिकाणी आटोक्यात आणण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी बॉडीगार्डची नेमणूक केली आहे.  कतरिना कैफच्या बॉडीगार्डचे नाव दीपक सिंह असून त्याच्या समोर बॉलिवूडचे अभिनेतेही फिके पडतील अशी त्याची पर्सनालिटी आहे.

जिममध्ये कमावलेली बॉडी आणि अंगात सुट आणि डोळ्यावर काळा गॉगल लावून जेव्हा तो कॅटरिना कैफबरोबर बाहेर पडतो तेव्हा त्याचा स्वॅग पाहण्यासारखा असतो.  

 

दीपकनं काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला चित्रपट निर्माते, अभिनेते आणि नृत्य दिग्दर्शकांनी अभिनय क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं त्यांच्या ऑफर कधीच स्वीकारल्या नाहीत.  दीपक सिंग एका लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे. दीपकला कधीही बॉडीगार्ड बनायचे नव्हते. त्याचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न होते.

कतरिनाशिवाय दीपक सिंग शाहरुख खान, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रणवीर सिंग, राणी मुखर्जी, सचिन तेंडुलकर यांबरोबरच अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा बॉडीगार्ड होता. दीपकच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास तो मॉडेल किंवा अभिनेताच आहे असे वाटल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :कतरिना कैफ