Join us  

कोट्यवधीची मालकीण आहे अक्षय कुमारच्या कुटंबातली ही व्यक्ती, संपत्तीच्या बाबतीत इतर अभिनेत्यांनाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 11:29 AM

२०१४ साली प्रदर्शित झालेल्या  'फगली' सिनेमाची ती निर्माती होती. अलका तिच्या संसारात खूप खुश आहे. ज्या बिल्डींगमध्ये अक्षय राहतो. त्याच बिल्डींगमध्ये अलकाही राहते. 

कलाकारमंडळी त्यांच्या फिल्मी करिअरप्रमाणे खासगी आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असतात. फक्त कलाकारच नाही तर त्यांच्या घरातली मंडळीही प्रचंड चर्चेत असतात. हिंदी चित्रपटसृष्टीत खिलाडी अक्षय कुमारही जितका चर्चेत असतो तितकेच त्याचे कुटुंबातले सदस्यही चर्चेत असतात.पत्नी ट्विकल खन्ना कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतं. आता याच पाठोपाठ अक्षय कुमारच्या घरातली आणखी एख व्यक्ती चर्चेत आली आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती आहे अलका भाटिया.  अलका भाटिया ही अक्षय कुमारची बहिण आहे. अलकाबद्दल फारसं कोणाला माहिती नाहीय.अलकाही अक्षयची लहान बहिण आहे. अलका चर्चेत येण्यास कारण म्हणजे अक्षय कुमारपेक्षाही ती जास्त श्रीमंत आहे. 

वाचून थोडं आश्चर्य वाटले असणार पण अलका कोट्यवधी संपत्तीची मालकीण असल्याचे समोर आले आहे. अक्षयच नाही तर इतर गलेलठ्ठ कमाई करणारे बॉलिवूड सेलिब्रेटींनाही ती संपत्तीच्या बाबतीत मागे टाकते.अलकाने व्यावसायिक सुरेंद्र हिरानंदानी यांच्यासोबत लग्न केले आहे.

सुरेंद्र हिरानंदानी हे भारतातल्या श्रीमंताच्या यादीत टॉप १०० मध्ये त्यांचे नाव गणले जाते. यावरुन तुम्हाला अलका किती आलिशान आयुष्य जगते याचा अंदाज आलाच असेल.  अलकाही सुरेंद्र यांची दुसरी पत्नी आहे. २३ डिसेंबर २०१२ मध्ये अलकाने सुरेद्र यांच्याशी लग्न करत तिच्या सुखी संसाराला सुरुवात केली होती. 

मुळात अलकाला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. वयाच्या चाळीशीत दुसरे लग्न करण्याचा अलकाचा निर्णय अक्षयला आवडला नव्हता. दुसरीकडे अलकाचे दुसरे पती सुरेंद्र तिच्यापेक्षा  वयाने १५ वर्षांनी मोठे आहेत. इतकेच काय तर सुरेंद्र यांनाही पहिल्या लग्नापासून तीन मुली आहते. त्यांच्या मुलींचे वयसुद्धा लग्न करण्या इतकी त्या मोठ्या आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे अलकाच्या निर्णयावर अक्षय खुश नव्हता. बहिणीच्या हट्टापुढे अक्षयला हार मानावी लागली.

विशेष म्हणजे अलका भाटिया स्वतः निर्माती आहे.२०१४ साली प्रदर्शित झालेल्या  'फगली' सिनेमाची ती निर्माती होती. अलका तिच्या संसारात खूप खुश आहे. ज्या बिल्डींगमध्ये अक्षय राहतो. त्याच बिल्डींगमध्ये अलकाही राहते. 

टॅग्स :अक्षय कुमार