Join us  

दारुच्या आहारी गेली होती मीना कुमारी; विवाहित पुरुषासोबत लग्न केलं अन् असा झाला दुर्दैवी शेवट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 11:40 AM

Meena kumari: लग्नानंतर नवऱ्याने घातलेल्या बंधनांमुळे लोकही तिला ‘पिंजरे का पंछी’ असं म्हणून चिडवू लागले होते.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीना कुमारी (meena kumari). उत्तम अभिनयापेक्षाही मीनकुमारीच्या सौंदर्याची विशेष चर्चा रंगली. किंबहुना आजही त्या आपल्या नसतानाही त्यांच्या सौंदर्याची चर्चा होते. आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे त्यांनी प्रत्येक सिनेमा हिट केला. कलाविश्वात नाव, प्रसिद्धी, यश मिळवणाऱ्या मीनाकुमारी यांनी खासगी आयुष्यात अनेक हालअपेष्टा भोगल्या. लहानपणापासून स्ट्रगल करणाऱ्या या अभिनेत्रीचा मृत्यूदेखील तितकाच दु:खद झाला.

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मिनाकुमारी यांना लहानपणापासून पैसे कमवायची सवय लागली. त्यामुळे नाईलाजास्तोवर त्या कलाविश्वाकडे वळल्या. गरज म्हणून अभिनय करणाऱ्या मिना कुमारी यांना कालांतराने हे क्षेत्र आवडू लागलं आणि अभिनय त्यांचा छंद झाला.  १९५२ मध्ये आलेल्या बैजू बावरा या सिनेमातून त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. परंतु, आयुष्यभर प्रसिद्धी मिळवणाऱ्या या अभिनेत्रीने शेवटच्या दिवसात कलाविश्वावर अनेक ताशेरे ओढले. मीना कुमारी यांच्या आयुष्यात इतकी वादळं आली की त्यांना ट्रॅजेडी क्वीन असं म्हटलं जाऊ लागलं. 

विवाहित पुरुषासोबत केलं लग्न

कलाविश्वात काम करत असताना मीना कुमारी, कमल अमरोही यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी कमल अमरोही यांचं पहिलं लग्न झालं होतं. परंतु, त्यांचंही मीना कुमारीवर प्रेम असल्यामुळे या दोघांनी गपचूप लग्न केलं. लग्नानंतर सुरुवातीचा काळ चांगला गेला. मात्र, त्यानंतर काही महिन्यांमध्येच या दोघांमध्ये वाद व्हायला लागले. मीना कुमारीचं उशीरापर्यंत काम करत राहणं कमल अमरोही यांना मान्य नव्हतं. ज्यामुळे ते तिच्यावर काही बंधन लादू लागले. एका मुलाखतीमध्ये कमल यांच्या मुलाने ताजदार याने अनेक खुलासे केले आहेत. मीना कुमारी यांना संध्याकाळी ६ पर्यंत घरी येण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. तसंच तोकडे कपडे घालायचे नाहीत. कोणत्याही अभिनेत्यासोबत बाहेर जायचं नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं यापुढे कोणताही नवा सिनेमा साईन करायचा नाही, अशी खूप बंधनं त्यांच्यावर होती.

कमलने घातलेल्या या निर्बंधांमुळे मीना कुमारी यांना कैद झाल्यासारखं वाटू लागलं होतं. इतकंच नाही तर लोकही तिला ‘पिंजरे का पंछी’ असं म्हणून चिडवू लागले होते. कमलच्या वाढत असलेल्या अटींमुळे त्यांच्यात वाद वाढत गेले. परिणामी, दोघांनी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा मार्ग निवडला.

दारुचं लागलं व्यसन

घटस्फोटानंतर मीना कुमारी यांनी अभिनय करणं सुरु ठेवलं. पण, त्याच सोबत त्यांना दारुचंही व्यसन जडलं होतं. त्यांच्या मद्यपानाचं प्रमाण इतकं वाढलं की त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडू लागली. परिणामी, त्यांना गंभीर आजार झाला. त्यांचा हा आजार इतका वाढला कि त्यांना लिव्हर सिरोसिस झाला. या आजारपणातही औषधांऐवजी त्या दारु प्यायच्या. या शेवटच्या दिवसांमध्येही त्या एकट्याच होत्या. अखेर एकटेपण, अतिमद्यपान यामुळे ३१ मार्च १९७२ मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. 

टॅग्स :मीना कुमारीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा