Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘माझं लग्न न होण्यासाठी मीडिया जबाबदार’ - राखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 19:50 IST

होय, तुम्ही वाचताय ते अगदी खरं आहे. खुद्द राखी सावंत हिनं मीडियावर ‘माझं लग्न न होण्यासाठी केवळ मीडियाच जबाबदार’ ...

होय, तुम्ही वाचताय ते अगदी खरं आहे. खुद्द राखी सावंत हिनं मीडियावर ‘माझं लग्न न होण्यासाठी केवळ मीडियाच जबाबदार’ असल्याचा आरोप केलाय. बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त विचारांमुळे राखी नेहमीच चर्चेत असते. आता मात्र तिने कहरच केलाय. स्वत:चं लग्न होत नाही म्हणून तिने चक्क मीडियालाच धारेवर धरलेय. टीव्ही अभिनेत्री राखी सावंत ही लवकरच ‘सावधान इंडिया’ च्या एका एपिसोडमध्ये वाईट सुनेची भूमिका करणार आहे. जी एका १६ वर्षाच्या मुलाशी लग्न क रते. याअगोदर सात वर्षांपूर्वी टीव्हीवर एक रिअ‍ॅलिटी शो आला होता ‘राखी का स्वयंवर’ नावाचा. ज्यात तिला अनेक लग्नाचे प्रस्ताव आले पण तिने ते नाकारले आणि आता ती म्हणतेय, माझं लग्न झालं नाही. कारण माझ्यासाठी उपवर तरूण आलेच नाहीत. त्यामुळे माझं लग्नाचं स्वप्न अर्धवटच राहिलं. इलेश परूजनवाला याच्यासोबत तिचं नातं हे केवळ तिला फ्लॅट खरेदी करायचा असल्याने तिने निर्माण केलं होतं. मात्र, आता तिला चांगल्या मुलांची स्थळं येत नाहीत म्हणून तिने आता मीडियावर लग्न न जमण्याचा ठपका ठेवला आहे. राखीला तिच्या पतीकडून असणाऱ्या  अपेक्षा सांगताना ती म्हणते,‘मी एखाद्या स्ट्रगलर तरूणासोबत लग्न करू इच्छित नाही. माझ्या आवश्यकतांची पूर्तता करणाऱ्या  युवकाशीच मी लग्न करणार आहे.’